सोमय्या कॉलेजात युवकांमध्ये मानवी मूल्य व नैतिक मूल्यांचे संवर्धन” वेबिनार
वृत्तवेध ऑनलाईन। 2 Nov 2020
By:Rajendra Salkar, 16:00
By:Rajendra Salkar, 16:00
कोपरगाव : के जे सोमैया कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय मध्ये स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने “युवकांमध्ये मानवी मूल्य व नैतिक मूल्यांचे संवर्धन” या विषयावर राष्ट्रीय वेबीनार चे आयोजन करण्यात आले.
या राष्ट्रीय वेबिणार मध्ये एकूण 486 तज्ञ व विद्यार्थी सहभागी झाले होते यातील 60 पेक्षा जास्त सहभागी मान्यवर देशातील हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तरप्रदेश,पंजाब, हरियाणा, कर्नाटक, बिहार,सिक्कीम, आसाम,मेघालय, त्रिपुरा , मणिपूर इ.राज्यातून या वेबिनारमध्ये सहभागी झाले होते. या राष्ट्रीय वेबिनारचे वैशिष्टय म्हणजे संसाधन व्यक्ती असणारे डॉ. अश्विनीकुमार भारद्वाज व डॉ. प्रीतमकुमार बेदरकर ही गुरुशिष्य जोडी होय. वेबिनार च्या अध्यक्षस्थानावरून बोलताना बेजॉन देसाई फाऊंडेशनचे सीईओ डॉ. अश्विनीकुमार भारद्वाज म्हणाले की “मानवी उत्क्रांती पासून ते आजच्या सुसंस्कृत समाजापर्यंत नैतिक मूल्यांमुळेच मानवाचे उत्थान झालेले आहे व या मूल्यामुळे मानव इतर प्राण्यांपासून वेगळा व वैशिष्ट्यपूर्ण बनला आहे यातूनच आदर्श कुटुंबव्यवस्था व समाजव्यवस्था निर्माण झाली आहे”. डॉ.प्रीतमकुमार बेदरकर यांनी महाविद्यालयीन तरुणांमध्ये मूल्य व नीती तत्वे यांचे संस्कार शिक्षणाबरोबरच अंगात रुजणे महत्वाचे आहे तरच भारतात सर्वत्र शांतता व सौहाद्रता प्रस्थापित होईल अशा शब्दांमध्ये मूल्य संस्कार रुजवण्याची गरज अधोरेखित केली. दोन सत्रांमध्ये झालेल्या या राष्ट्रीय वेबिनार मध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एस.यादव यांनी आलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत केले. IQAC चे समन्वयक प्रा. व्हि. सी. ठाणगे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व प्रा. व्ही.एस.आहेर यांनी सूत्रसंचालन केले. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे समन्वयक डॉ.वसुदेव साळुंके यांनी आभार मानले. या कार्यक्रमासाठी कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. अशोकराव रोहमारे व सचिव अँड. संजीव कुलकर्णी यांनी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. रवींद्र जाधव,प्रा.कैलास वाघ,प्रा.कुंजीर यांनी प्रयत्न केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. रवींद्र जाधव,प्रा.कैलास वाघ,प्रा.कुंजीर यांनी प्रयत्न केले.
Post Views:
305