तरुणांनो निर्व्यसनी राहुन,  व्यायामात सातत्य ठेवाल, तर प्रतिकारशक्ती वाढेल – राजेंद्र झावरे

तरुणांनो निर्व्यसनी राहुन,  व्यायामात सातत्य ठेवाल, तर प्रतिकारशक्ती वाढेल – राजेंद्र झावरे

वृत्तवेध ऑनलाईन।2Nov2020
By:Rajendra Salkar, 17:30

कोपरगाव : डाऊच खुर्द परिसरातील तरुणांना शरीर तंदुरुस्त व निरोगी बनवण्यासाठी महाराष्ट्र टायगर ग्रुपचे अध्यक्ष पै. तानाजी जाधव यांच्या संकल्पनेतून  अकरा लाख रुपये खर्च करून शिवराणा हेल्थ क्लबची निर्मिती करून डाऊच खुर्द ग्रामपंचायतीने कोपरगाव तालुक्यात आपले नाव केले आहे. आजचा तरुण निर्व्यसनी असला पाहिजे. व्यायामात सातत्य ठेवले तर रोगप्रतिकार शक्ती वाढते असे प्रतिपादन शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजेंद्र झावरे यांनी केले.

 कोपरगाव तालुक्यातील डाऊच खुर्द येथे शिवराणा हेल्थ क्लब व ग्रामपंचायतीने घेतलेल्या पैलवान मार्गदर्शन कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रमोद लबडे, भागवत गुरसळ, चंद्रकांत गुरसळ,  शिवसेना शहर प्रमुख कलविंदर डडीयाल, भैय्या तिवारी, 
 भरत मोरे, टायगर ग्रुपचे पै. दीपक कांदळकर, पै शंकर जाधव, गगन हाडा, पंचायत समितीचे सदस्य बाळासाहेब रहाणे, सरपंच संजय गुरसळ, ग्रामसेवक जालिंदर पाडेकर, दिगंबर पवार, देवा पवार, बापू पवार, चंद्रकांत गुरसळ, बाळासाहेब गुरसळ, ग्रामपंचायत सदस्य शंकर गुरसळ, पंकज पुंगळ, माणिक चव्हाण, कोच ऋषिकेश ससाने, योगेश पवार, सलीम शेख, मुन्ना सय्यद, रावसाहेब पवार, राजेंद्र गाडेकर, अशोक पवार, इरफान शेख, पप्पू पेकळे, अविनाश धोक्रट, किरण कुरे , विशाल झावरे, जाफर सय्यद ,प्रवीण शेलार , गोरक्ष रणधीर, अर्जुन होन, शशीकांत पवार ,अजित जाधव, मच्छिंद्र गुरसळ,
बाबासाहेब गुरसळ ,मुन्नाभाई सय्यद,साईकांत होन, आदीसह शिवराणा ग्रुपचे सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. 
प्रास्ताविकात संजय गुरसळ यांनी  परिसरातील तरुण युवकांना कोपरगाव शहराप्रमाणे हेल्थ क्लब असावे असा आमचा मानस होता कुटुंबातील प्रत्येक तरुण हा सुदृढ असायला हवा असे महाराष्ट्र टायगर ग्रुपचे संस्थापक पै.तानाजी जाधव यांनी प्रेरणा घेऊन आम्ही सुसज्य व्यायाम शाळेची निर्मिती करून दिली.
 प्रमोद लबडे म्हणाले,आजचा तरुण जर सुदृढ असला तर उद्याचे भविष्य चांगले जाईल. तरुणांनी व्यसनापासून दूर राहिले पाहिजे. जीवनामध्ये व्यायामाला खूप महत्त्व आहे. 
 कलविंदर डडियाल ,भरत मोरे, बाळासाहेब राहणे यांनी मनोगत व्यक्त केले. व्यायाम शाळेसाठी भरीव मदत करणारे चंद्रकांत गुरसळ, गोरक्ष रणधीर, मुन्ना सय्यद व बाबासाहेब गायकवाड यांचा सन्मान या वेळी करण्यात आला. शेवटी आभार माजी सैनिक भागवतराव गुरसळ यांनी मानले.

Leave a Reply

You cannot copy content of this page