नादुरुस्त  रोहित्रांच्या जागेवर  एका  वर्षात २२२ नवे रोहित्र दिले – आ. आशुतोष काळे

नादुरुस्त  रोहित्रांच्या जागेवर  एका  वर्षात २२२ नवे रोहित्र दिले – आ. आशुतोष काळे

 ST बस स्थानकात घाणीचे साम्राज्य, प्रवासी हैराण 

वृत्तवेध ऑनलाईन।2Nov2020
By:Rajendra Salkar, 18:30

कोपरगाव : मागील पाच वर्षात विजेचे प्रश्न रखडलेले होते. विजेच्या बाबतीत शेतकरी व नागरिकांच्या तक्रारी येत होत्या. नागरिकांची होत असलेली गैरसोय लक्षात घेवून एकाच वर्षात नादुरुस्त असलेल्या २२२ रोहीत्रांच्या जागी नवीन वीज रोहित्र बसविले असल्याची माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली असून अधिकाऱ्यांनी नागरिकांना सन्मानाची वागणूक द्यावी अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

            कोपरगाव मतदार संघातील महावितरण, महापारेषण,एस.टी. महामंडळ व रेल्वे विभागाची आढावा बैठक आमदार काळे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार (दि.२) रोजी सकाळी ११ वाजता कोपरगाव तहसील कार्यालयाच्या सभागृहात संपन्न झाली. यावेळी सबंधित विभागाच्या बाबतीत नागरिकांना येत असलेल्या अडचणींचा आढावा घेतांना ते बोलत होते.
 यावेळी बोलतांना ते पुढे म्हणाले की, अधिकाऱ्यांनी आपले कर्तव्य चोख बजावावे किरकोळ कामे करण्याच्या सुचना देणे योग्य नाही.तालुक्यात महावितरण विभागाच्या बाबत असंख्य तक्रारी आहेत.  नविन विजकनेक्शन जोड,दुरुस्ती,बिल वसुली,विजबिल वाढी पासुन विद्युत रोहीत्रे बसविण्या पर्यंत महावितरण व महापारेषण विभाग समाधानकारक काम करीत नाही.ग्राहकांना योग्य वेळेत  योग्य सेवा पुरवली जात नाही यापुढे असे चालणार नाही. करोनाचे महासंकट त्यात निसर्गाची अवकृपा यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.अशा परिस्थितीत महावितरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी विजबिल वसुलीसाठी आरेरावी ची भाषा न वापरता शेतकऱ्यांशी संयमाने बोलुन सन्मानाची वागणूक द्यावी.प्रलंबित वीज रोहीत्राचा प्रश्न सोडवितांना कागद पत्रांच्या प्रक्रियेला लागणारा कालावधी कमी करून वीज ग्राहकांना त्रास कमी करावा. कोपरगाव ग्रामीण उपविभागामध्ये जिल्हा नियोजन मधून जवळपास ६० लाखाचे वीज वाहक वाहिन्या स्थलांतरीत करण्याचे काम केले जाणार आहे. यामध्ये प्रामुख्याने अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला कोपरगाव शहरालगतच्या आढाव वस्ती, जानकी विश्व वडांगळे वस्ती व संवत्सर दशरथवाडी येथील रोहित्र यांचा समावेश असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. रस्त्याच्या बाजूंनी पथदिव्यांचे पोल उभे करण्यासाठी सबंधित ग्रामपंचायतींना नाहरकत परवानगी देतांना सबंधित रस्त्याच्या आराखड्याची पडताळणी करून घ्यावी जेणेकरून भविष्यात पथदिव्यांचे पोल अनधिकृत जागेत रोवले जावून पुन्हा स्थलांतरीत करण्याची वेळ येणार नाही याची काळजी घ्या.
            कोपरगाव बस स्थानक परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले असून त्याचा प्रवाशांना त्रास होत आहे. बसस्थानक परिसरातील रस्त्यांची अवस्था अतिशय वाईट झाली आहे त्यामुळे याबाबत तातडीने आगार प्रमुखांनी तातडीने उपाय योजना करून प्रवाशांना आहोत असलेला त्रास कमी करावा. बस सेवा सुरु झाली आहे येणारा दिवाळी सण पाहता बस प्रवासी वाढणार आहेत. त्यामुळे प्रत्येक फेरीदरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून प्रत्येक फेरीला बसच्या आतून व बाहेरून निर्जंतुकीकरण करावे. प्रवाशांना मास्क लावण्याचा आग्रह करून बस मध्ये प्रवेश द्यावा. चालक, वाहकांनी देखील प्रवासा दरम्यान काळजी घेण्याच्या सूचना द्याव्यात. विस्थापित टपरीधारकांचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी बसआगार परिसरात व्यापारी संकुल बांधण्यासाठी अधिवेशनात प्रश्न उपस्थित करून त्याकडे सभागृहाचे लक्ष वेधले आहे. त्याला परिवहन मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून  त्याबाबत पाठपुरावा सुरु आहे.
            रेल्वे विभागाने मतदार संघात अनेक ठिकाणी रेल्वे क्रॉसिंग जवळ नागरिकांच्या सोयीसाठी बोगदे तयार केले असले तरी पावसाळ्यात व आजमितीला त्या बोगद्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे या मार्गावरून ये-जा  करणाऱ्या नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे त्याबाबत रेल्वे प्रशासनाने तातडीने उपाय योजना कराव्या अशा सूचना चारही विभागाच्या अधिकाऱ्यांना या बैठकीत दिल्या.
                यावेळी पंचायत समिती सभापती सौ. पौर्णिमाताई जगधने, उपसभापती अर्जुनराव काळे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम, जि.प.सदस्य राजेशआबा परजणे, सुधाकर दंडवते, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक पद्माकांत कुदळे, हरिभाऊ शिंदे, विठ्ठलराव आसने, अशोक काळे, आनंदराव चव्हाण,  अरुण चंद्रे, जिनिंग प्रेसिंगचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार, पंचायत समिती सदस्य श्रावण आसने, मधुकर टेके, रोहिदास होन, राष्ट्रवादी शहराध्यक्ष सुनील गंगुले, नगरसेवक मंदार पहाडे, संदीप पगारे, सुरेगावचे सरपंच शशिकांत वाबळे, गौतम बँक संचालक सुनील शिलेदार, समाज सेवक संजय काळे, उपकार्यकरी अभियंता भगवंता खराटे, दिनेश चावडा, कोपरगाव आगार प्रमुख अभिजित चौधरी, कोपरगाव रेल्वे स्टेशन मास्तर प्रसाद आदी उपस्थित होते.
               चौकट— नागरिकांना येत असलेल्या ज्या अडचणी आपल्या विभागाच्या स्थानिक पातळीवरच  सुटू शकतात त्या अधिकाऱ्यांनी तातडीने सोडवाव्या. यापुढील आढावा बैठकीला येतांना मागील आढावा बैठकीत ठरल्याप्रमाणे केलेल्या कामांचा गोषवारा सादर करावा.  – आमदार आशुतोष काळे .

Leave a Reply

You cannot copy content of this page