आ. काळे यांच्या आदेशाने गोदावरी उजव्या कालव्याची पाहणी

पोहेगाव परिसरातील शेतकऱ्यांच्या तक्रारींची दखल

कोपरगाव :

आवर्तनाच्या काळाचे गोदावरी उजव्या कालव्यातून होणाऱ्या पाणी गळतीमुळे शेतीचे नुकसान होते. तसेच पोहेगाव-वेस मार्गावरील पुलावरून जाताना करावी लागणारी सर्कस आली अडचणीबाबत पाहणी करण्याचे आदेश आमदार आशुतोष काळे यांनी दिले होते त्याप्रमाणे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली आहे.

पोहेगाव परीसरात गेजकुंडी मुळे कालव्यातून मोठ्या प्रमाणात पाणी गळती होवून कालव्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या जवळपास चार किलोमीटर परिसरातील शेती पिकांचे नुकसान होत होते.गळतीमुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात असून, दोन्ही बाजूला असलेल्या शेतकर्‍यांच्या शेतीचे नुकसान होत आहे तसेच पोहेगाव-वेस मार्गावरील पुलावरून जाण्यासाठी भराव नसल्यामुळे वाहनांना हा पूल ओलांडतांना मोठी कसरत करावी लागत होती. त्या मुळे अपघात होण्याची परिस्थिती निर्माण होते. अशा अनेक तक्रारी पोहेगाव परिसरातील शेतकऱ्यांनी आमदार आशुतोष काळे यांच्याकडे केल्या होत्या या तक्रारींची दखल घेत त्याबाबत आमदार आशुतोष काळे यांनी बैठकीत अधिकाऱ्यांना समक्ष पाहणी करण्याच्या सूचना केल्या होत्या .

त्या सूचनेनुसार पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सागर शिंदे, उपविभागीय अभियंता प्रशांत ढोकणे, आर.पी.पाटील,सहाय्यक अभियंता महेश गायकवाड, शाखा अभियंता ओंकार भंडारी आदी अधिकाऱ्यांनी पोहेगाव, शहापूर परिसरात जावून उजव्या कालव्यामुळे होत असलेल्या नुकसानीची पाहणी केली.

यावेळी नंदकिशोर औताडे, राजेंद्र औताडे उपस्थित होते. गळती होत असलेल्या कालव्याच्या दुरुस्तीसाठी व पोहेगाव-वेस रोडवर असलेल्या या पुलावर भर टाकण्याबाबत कनिष्ट अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे .

Leave a Reply

You cannot copy content of this page