अल्पवयीन मुलाचे अपहरण, नागरिकांमध्ये खळबळ
Kidnapping
वृत्तवेध ऑनलाईन | 4 Nov 2020, By:Rajendrasalkar,17:30
कोपरगाव बेट भागातील एका अल्पवयीन मुलांचे अपहरण करण्यात आले आहे. त्यामुळे कुटूंबियांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. अपहरण झालेल्या मुलांचे वय १५ वर्षे ५ महिने एवढे आहे.
कोपरगाव बेट परिसरातील राहत्या घरातून मंगळवारी (३) रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास विशाल रमेश भाकरे या १५ वर्षीय मुलाचे अपहरण करण्यात आले आहे. त्यामुळे तिच्या कुटूंबियांनी भीती व्यक्त केली आहे.
याप्रकरणी मुलाची आई सौ सुनिता रमेश भाकरे ३५ हिने कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे.
अज्ञात आरोपी विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक अर्जुन दारकुंडे हे तपास करीत आहेत.





