सोनेवाडी विकास सोसायटीच्या अध्यक्षपदी गुडघे तर उपाध्यक्षपदी जावळे
वृत्तवेध ऑनलाइन।Thu 5 Nov2020
By:RajendraSalkar,18:03
कोपरगाव : तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या सोनेवाडी विकास सोसायटीच्या अध्यक्षपदी परजणे गटाचे संतोष तुकाराम गुडघे यांची तर उपाध्यक्षपदी कोल्हे गटाचे हेमराज कर्णा जावळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
सोनेवाडी सोसायटी मध्ये कोल्हे परजणे युतीची सत्ता असून रोटेशन पद्धतीने अध्यक्ष उपाध्यक्षपदाची निवड केली जाते.रोटेशन पद्धतीने ठरलेल्या वेळी धनाजी रामचंद्र जायपत्रे यांनी अध्यक्षपदाचा तर शांताबाई विठ्ठल गुडघे यांनी उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर ही निवड करण्यात आली.
निवड प्रक्रियेचे कामकाज सहाय्यक निबंधक नामदेव ठोंबळ यांनी पाहिले. त्यांना सचिव अशोक गायकवाड यांनी मदत केली.यावेळी ज्ञानदेव गुडघे, तुकाराम गुडघे ,बाबासाहेब फटांगरे ,पोलीस पाटील दगू गुडघे, दिलीप गुडघे, साहेबराव मिंड, साहेबराव घोंगडे, विजय फटांगरे,बहिरू मिंड, रघुनाथ मिंड, भाऊसाहेब गुडघे, धनाजी जायपत्रे, शांताबाई गुडघे, निवृत्ती खरात, सुनील मिंड ,सुखदेव चौधरी, सुनील गुडघे अदी उपस्थित होते.निवडी नंतर अध्यक्ष गुडघे व उपाध्यक्ष जावळे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी ज्ञानदेव गुडघे यांनी सांगितले की सोसायटींना उर्जितावस्था आणण्यासाठी जिल्हा बँकचे कर्ज वाटप केले जाते ते अति अल्प असून वाढीव कर्ज वाटप करण्यासाठी जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाने प्रयत्न करावे. आवाजवी कागदपत्रे व इतर गोष्टींची पूर्तता करण्यात सभासदांना मोठा मानसिक त्रास सहन करावा लागतो. यात बदल करून सुटसुटीत व्यवहार कसे होईल असे आपल्या धर्तीवर प्रयत्न करावे असे त्यांनी सांगितले. शेवटी आभार बाबासाहेब फटांगरे यांनी मानले..