कालवा सल्लागार समितीची बैठक कोपरगावात- आ. आशुतोष काळे

कालवा सल्लागार समितीची बैठक कोपरगावात – आ. आशुतोष काळे

वृत्तवेध ऑनलाइन।Thu 5Nov2020
By:RajendraSalkar,20:23

कोपरगाव :  गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रात कालवा सल्लागार समितीची बैठक घ्यावी या मागणीला यश मिळाले असून गोदावरी डावा तट कालव्याच्या सल्लागार समितीची बैठक शनिवार (दि.७) रोजी कोपरगाव येथे आयोजित केली आहे या बैठकीसाठी शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन आमदार आशुतोष काळे यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात केले आहे.

दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात आमदार आशुतोष काळे यांनी असे म्हटले आहे की,मागील पाच वर्षांपासून कालवा सल्लागार समितीची बैठक ही मुंबई येथे होत होती.त्यामुळे शेतकऱ्यांना या बैठकीसाठी उपस्थित राहता येत नव्हते यासाठी ही बैठक गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रातच घ्यावी जेणेकरून शेतकऱ्यांना मिळणाऱ्या अवर्तनाची व या बैठकीत झालेल्या निर्णयाची माहिती मिळून आपल्या पिकांचे नियोजन करता यावे यासाठी मागील पाच वर्षांपासून पाठपुरावा सुरू होता. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होताच जलसंपदा मंत्री नामदार जयंतरावजी पाटील व नामदार छ्गनरावजी भुजबळ यांच्याकडे देखील ही मागणी लावून धरली होती त्या मागणीला अपेक्षित यश मिळाले असून कालवा सल्लागार समितीची बैठक आता कोपरगाव मध्ये होणार आहे.
 त्याची अंमलबजावणी ही दारणा प्रकल्प अंतर्गत गोदावरी कालव्यांची रब्बी व उन्हाळा हंगाम सन २०२०/२१चे नियोजन संदर्भात कालवा सल्लागार समितीची बैठक नासिक जिल्ह्याचे पालकमंत्री तथा अन्न, व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण मंत्री नामदार छ्गनरावजी भुजबळ यांचे अध्यक्षतेखाली शनिवारी सकाळी १०.०० वाजता कृष्णाई मंगल कार्यालय येथे व दुपारी २.३० वाजता  उजव्या तट कालव्याच्या संदर्भात राहता येथील उपविभागाचे निरीक्षण गृह येथे होणार असून या बैठकीसाठी
शेतकऱ्यांनी मोठया संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आमदार आशुतोष काळे यांनी केले आहे

Leave a Reply

You cannot copy content of this page