शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना ८ व्या स्मृतिदिनी अभिवादन

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना ८ व्या स्मृतिदिनी अभिवादन

नगराध्यक्ष झालो, साहेबांचा हात माझ्या खांद्यावर पडला ; आजही त्या आठवणी तशाच ताज्या – राजेंद्र झावरे 

वृत्तवेध ऑनलाईन।Tue17Nov2020
By:RajendraSalkar,18:00

कोपरगाव : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना मंगळवार १७ नोव्हेंबर रोजी ८ व्या स्मृतिदिना निमित्त कोपरगांव शिवसेनेच्या वतीने आदरांजली वाहण्यात आली.

शिवसेनाप्रमुख म्हणजे शिवतेज. मराठी माणसाच्या हृदयात अस्मितेचा अंगार आणि अवघ्या देशात हिंदुत्वाची मशाल चेतविणाऱ्या या शिवतेजाला वंदन करण्यासाठी शिवतीर्थावर लाखो शिवसैनिक व शिवसेनाप्रेमींचा जनसागर उसळत असतो. परंतु या वर्षी कोरोनाच्या महामारीमुळे शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आवाहन केले होते की आहात तिथूनच शिवसेनाप्रमुखांना मानवंदना द्या,

कोपरगावातील शिवसैनिकांनी आपल्या लाडक्या “साहेबांना” ८ व्या स्मृतिदिना निम्मित मंगळवारी सकाळी ११ वाजता संत ज्ञानेश्वर इंग्लिश मीडियम स्कूल येथे एका छोटेखानी कार्यक्रमात आदरांजली अर्पण करून अभिवादन केले. अध्यक्षस्थानी जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे हे होते.

यावेळी राजेंद्र झावरे म्हणाले, ज्यांना देव भेटले ते संत झाले, ज्यांना साहेब भेटले ते भाग्यवंत झाले, माझ्यासाठी शिवसेनाप्रमुख विठ्ठलच होते, अशा भावना व्यक्त केल्या, राजकारण्यांना सत्ता असतांनाही नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी वेळ नव्हता. अशा वेळी ८०% समाजकरण व २०% राजकारण हा मंत्र साहेबांनी दिला या मंत्रापासून या प्रेरणा घेऊन शिवसैनिकांनी प्रस्थापितांच्या विरोध व दबावाला झुगारून देऊन एकत्रित करून कामाला सुरुवात केली. साहेबांच्या आशीर्वादाने २००१ साली कोपरगावात ३५ वर्षानंतर सत्तापालट होऊन जनतेतून प्रथम नगराध्यक्ष होण्याचा मान मिळाला. ज्यांच्या मुळे समाजात नाव,प्रातिष्ठा मिळाली, त्या देवाला भेटण्याची संधी ही मला मिळाली. साहेबांचा हाथ माझ्या खांद्यावर पडला त्यावेळी खूप भारावून गेलो.आजही त्याच भेटीच्या आठवणी तशाच ताज्या आहेत.

यावेळी उपजिल्हाप्रमुख कैलास जाधव,विधानसभा संघटक अस्लम शेख,शहरप्रमुख कलविंदरसिंग दडियाल, भरत मोरे,सरपंच संजय गुरसळ,ग्राहक संरक्षण कक्षाचे जिल्हाप्रमुख मुकुंद सिनगर, यांनी शिवसेनाप्रमुखांच्या सहवासातील आठवणींना उजाळा दिला. यावेळी युवासेना सह सचिव सुनील तिवारी, वाहतूकसेना जिल्हाप्रमुख इरफान शेख,युवानेते विक्रांत झावरे,अशोक लकारे,उपशहरप्रमुख विकास शर्मा,भूषण पाटणकर,गगन हाडा,आकाश कानडे,संघटक बाळासाहेब साळुंके,नितीन राऊत, सह संघटक वैभव गिते,दिलीप अरगडे, विभागप्रमुख रफिक शेख,जयेश हस्वाल,शैलेश वाघ,मयुर दळवी,किरण आडांगळे,किरण गायकवाड, सौरभ गायकवाड,रामदास शिंदे,विशाल झावरे,सचिन आसने, योगेश मोरे, लक्ष्मण मंजुळ,श्रीपाद भसाळे, राहुल शिंदे, राहुल देशपांडे,सतीश शिंगाणे, पप्पू पेकळे, अविनाश धोक्राट, जाफर सय्यद, राकेश वाघ,प्रवीण शेलार, अविनाश वाघ,अशोक पवार,वैभव हलवाई,निशांत झावरे,किरण सूर्यवंशी, अक्षय नन्नवरे, अक्षय वाकचौरे,कल्पेश मंडलिक, अशोक लांडे,रितेश राऊत, दिपक दळे आदी शिवसैनिक उपस्थित होते.
सूत्रसंचलन भरत मोरे यांनी केले तर आभार शहरप्रमुख कलविंदरसिंग दडियाल यांनी मानले.

Leave a Reply

You cannot copy content of this page