कोपरगावात पाडव्याच्या मुहूर्तावर ‘ज्याचा माल, त्याचा हमाल’ चे बोर्ड फडकले.
वृत्तवेध ऑनलाईन।Tue17Nov2020,
By:RajendraSalkar,20:20
कोपरगाव : ‘ज्याचा माल त्याचा हमाल, अंमलबजावणीसाठी सोमवारी (१५) रोजी दिवाळी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर कोपरगाव तालुका ट्रक चालक मालक ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात तसेच अण्णाभाऊ साठे चौकात “ज्याचा माल त्याचा हमाल” डिजीटल बोर्ड फडकले. तर व्यापारी दुकान, ट्रक वर कागदी बैनर लावण्यात आले असल्याची माहिती असोसिएशनचे अध्यक्ष आयुब कच्छी यांनी दिली.
या निर्णयाबाबत बोलताना अध्यक्ष आयुब कच्छी म्हणाले ‘सरकारच्या ६ सप्टेंबर २०१६ च्या आदेशात ट्रकधारकांनी मालाची भरणी-उतरणी देण्याचा उल्लेख नाही. ट्रकमध्ये साखर भरून देण्याची जबाबदारी साखर कारखान्यांची आहे. त्यांचे कामगार, हमालांची आहे. त्यांनी जबाबदारी पूर्ण करावी. कोपरगाव येथील मालट्रक वाहतूकदारांनी मालाच्या हमालीसह वाहतूक भाडे ट्रक व्यावसायिकांना परवडत नाही. त्यामुळे ते आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. व्यवसाय परवडण्यासाठी ट्रकधारक ‘ज्याचा माल त्याचा हमाल,ची अंमलबजावणी करणार आहेत. आज दिवाळी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर याचे फलक ठिकाणी लावण्यात आले आहेत. यापुढे मालाची वाहतूक भाड्याशिवाय हमालीची रक्कम जादाची घेण्यात येईल. यासंबंधीची जागृती असोसिएशनतर्फे करण्यात येईल.’ असेही कच्छी यांनी सांगितले.
आयुब कच्छी म्हणाले, मार्केट कमिटी मध्ये बोर्ड लावला यांचा अर्थ हा शासन निर्णय फक्त मार्केट व्यापा-याकरीता आहे. असा नाही हा शासन निर्णय कोपरगाव तालुक्यातील किराणा, सिमेंट, खत, स्टिल तसेच सर्व प्रकारच्या व्यापा-यांना लागू आहे. याची दखल कोपरगाव तालुक्यातील सर्व व्यापारी बंधूंनी घ्यावी व ट्रक वाल्याकडून वाराई घेऊ नये अन्यथा संबंधित व्यापा-यावर गुन्हे दाखल करण्यात येईल. त्याला संबंधित व्यापारी जबाबदार राहील याची दखल घ्यावी. असा इशाराही अध्यक्ष यांनी दिला आहे
यावेळी उपाध्यक्ष भारत वैद्य, सचिव शैलेश रावळ , आडत व्यापारी ललीत धाडीवाल, सचिन सोनवणे, डॉ, शब्बीर, विकास वाळूंज, नंदू वाळूंज, सुनील गिते,राजूकच्छी, बबलू तिवारी,ऋषी आंबोरे, मंटू सोनवणे, अरूण सोमासे, पप्पू सोमासे,इतर असंख्य सभासद हजर होते.





