अल्पवयीन मुलीचा विनयभंग; जाब विचारण्यास गेलेल्या जमावावर दगडफेक

अल्पवयीन मुलीचा विनयभंग; जाब विचारण्यास गेलेल्या जमावावर दगडफेक

Of a minor girl Debauchery

३ आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी, एक फरार

वृत्तवेध ऑनलाईन |Thu18 Nov 2020, By:RajendraSalkar,16:20

कोपरगाव: शहरातील दत्त नगर भागात एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून जाब विचारण्यासाठी गेलेल्या जमावावर आरोपींनी तुफान दगडफेक केल्याची घटना समोर आली आहे.अल्पवयीन मुलीच्या छेडछाड प्रकरणाला हिंसक वळण मिळाले असून दगडफेकीचे व मारहाणीचे प्रकार घडले आहेत या घटनेत दोन जण जखमी झाले असून चार आरोपींपैकी तिघांना पोलीसांना अटक केली असून त्यांना न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. एका आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत.

कोपरगाव शहर पोलिस ठाण्याच्या माहितीनुसार दिनांक १७ नोव्हेंबरच्या सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास कोपरगाव शहरातील दत्तनगर भागात अल्पवयीन मुलगी आणि तिची बहीण सार्वजनिक शौचालयाकडे जात असताना त्या ठिकाणी उभे असलेले मोद्या मंजुळ सोन्या मंजुळ,गटर मंजुळ आणि विशाल गायकवाड यांनी फिर्यादी मुलीची बहिणीचा हात धरून ओढला असता , मुलीने त्या ठिकाणाहून पळ काढत सार्वजनिक शौचालयात गाठले परंतु तरीही आरोपीने तिचा पिच्छा सोडला नाही ती शौचालयात गेली असता हे चौघांनी दार वाजवून विनयभंग केला आहे तसेच अल्पवयीन दोन्ही मुलींना दमदाटी केली आहे,
हा प्रकार १७ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी घडल्यानंतर त्याचे पडसाद दत्तनगर परिसरात दुसर्‍या दिवशी उमटले. मुलीच्या घरच्यांनी आरोपींना जाब विचारण्यासाठी गेले असता १८ नोव्हेंबर रोजी रात्री ७ वाजण्याचे सुमारांस आपापसात वादावादी झाल्या त्याचे पर्यावसण मारहाणीत झाले व आरोपींनी मुलीच्या घरच्या लोकांवर विटा दगडफेक केली त्यात अनिल विघे व बशीर बागवान रा.गोरोबानगर कोपरगाांव हे जखमी झाले पोलीसांनी रात्री उशीरा दिड वाजता यातील चार आरापींपैकी तिघे मोद्या उर्फ सागर रामदास मंजुळ, सोन्या उर्फ अक्षय रामदास मंजुळ, गटर उर्फ अभिजित लक्ष्मण मंजुळ यांना अटक केली आहे.
चार जणांविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर ८१४/२० भारतीय दंडविधान कलम ३५४ ३५४ (अ) ३५४ (ड) ३२४ /३२४/ ५०४/ ३४ व बालकांचे लैंगिक छळापासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ८ १२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे, त्यांना कोपरगांव येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांचे समोर उभे केले असता दोन दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.

दगडफेक झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. रस्त्यावर दगड विटांचा खच पडला होता तर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक बोरसे हे करित आहेत.

Leave a Reply

You cannot copy content of this page