धक्कादायक! मुलीचा विनयभंग करून मारहाण करणारा फरार
The girl’s molestation
वृत्तवेध ऑनलाईन |Thu18 Nov 2020, By:RajendraSalkar,18:17
ठळक मुद्दे
आरोपी नकुल ठाकरे (पुर्ण नाव माहीत नाही.) रा. कोपरगाव फरार पोलीस लिस्ट वरील आहे.
कोपरगाव : पीडित मुलगी १८ नोव्हेंबर रोजी रात्री ५:१६ वाजण्याच्या सुमारास ब्रिजलाल नगर येथील बाग, कोपरगाव आरोपी नकुल ठाकरे याने फिर्यादी हिस घाण घाण शिवीगीळ करुन तिचा हात पकडुन तिला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करुन तिचा विनयभंग केला.
मुलीने कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली. त्याच्याविरुद्ध विनयभंग करणे, मारहाण करणे आदी कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तक्रारीची गांभीर्याने दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अंमलदार : पो. हे. कॉ./ ३९१ आर. पी. पुंड
पुढील तपास करीत आहे.