कोपरगावमध्ये दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी जेरंबद
चार आरोपी अटकेसह साडे सात लाखाचा मुद्देमाल जप्त, एक जण फरार
वृत्तवेध ऑनलाईन | Sun22 Nov 2020, By:RajebdraSalkar, 18:02
कोपरगाव: नगर – मनमाड महामार्गावर दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीचा कोपरगाव शहर पोलीस स्टेशनच्या पथकाने पर्दाफाश केला असून या प्रकरणात चार जणांना पोलिसांनी अटक केली आहे. तर साडे सात लाखाचा मुद्देमाल जप्त केला असून तर एक जण फरार झाला आहे.
अटक केलेल्यांवर नगर जिल्ह्यासह इतर जिल्ह्यात विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. पकडलेल्या आरोपींकडून अन्य गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे. आरोपींमध्ये महेश भाऊसाहेब मंचरे (वय २४), राहणार गोटुंबे आखाडा राहुरी सुरज लक्ष्मण वडमारे ( वय २२) राहणार आहेर वायगाव तालुका गेवराई जिल्हा बीड, राहुल कुंडलिक बुधनव (वय २२), राहणार खामगाव तालुका गेवराई जिल्हा बीड, फरार आरोपी भारत चितळकर राहणार गुंथेगाव तालुका गेवराई जिल्हा बीड, गफूर गणी बागवान रहाणार निंभारा मैदान कोपरगाव, यांचा समावेश आहे.
महेश मंजरे हा त्याच्या चार साथीदारासह पांढऱ्या रंगाच्या स्कार्पिओ जीप एम एच २३एएस ७४५८ एका बिगर नंबरच्या मोटार सायकलवरुन नगर-मनमाड़ रोडवरील बेट नाका परिसरातील कातकडे पेट्रोल पंप येथून कोठेतरी दरोडा टाकण्यासाठी जात असल्याची माहिती २१नोव्हेंबरला रात्री कोपरगाव शहर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांना गुप्त बातमी द्वारा मार्फत समजली. या माहितीवरुन सहपोलीस निरीक्षक दीपक बोरसे, ज्यांनी वरिष्ठांना कळविले पोलीस अधिक्षक अहमदनगर मनोज पाटील अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर दिपाली काळे उपविभागीय पोलिस अधिकारी शिर्डी संजय सातव यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक बारसे, सह फौजदार शैलेंद्र ससाणे , पोलीस हेड कॉन्स्टेबल गायमुखे, पोलीस कॉन्स्टेबल सुरज अग्रवाल संभाजी शिंदे राम खारतोडे प्रकाश नवाळी अनिस शेख होमगार्ड निलेश उगले रवी गायकवाड व ठोसर , यांनी सापळा लावून व पाठलाग करून आरोपींना ताब्यात घेतले. तर आरोपी भारत चितळकर हा पळून जाण्यात यशस्वी झाला आरोपी याची झडती घेतली असता त्यांच्याजवळ वरील नंबर ची पांडुरंगाची स्कार्पिओ जीप बिगर नंबरची मोटर सायकल पल्सर, २ लोखंडी कोयते , दोन लोखंडी गज , लाकडी दांडके, तीन मोबाईल मोबाईल असा एकूण सात लाख ४९ हजार रुपयांचा मुद्देमाल सापडला. आरोपी दरोड्याची तयारी करुन कोठेतरी दरोडा घालण्यासाठी जात असताना सापडल्याने पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.
Post Views:
364