वाढीव वीज बिल विरोधात कोपरगावात भाजपाचे वीज बिल होळी आंदोलन

वाढीव वीज बिल विरोधात कोपरगावात भाजपाचे वीज बिल होळी आंदोलन

Bjp The electricity bill was a movement

आघाडीचे नव्हे तर तिघाडीचे बिघाडी सरकार- आ. स्नेहलता कोल्हे

वृत्तवेध ऑनलाइन।Mon 23Nov2020, By:RajendraSalkar,14:00

कोपरगाव : लॉकडाऊनच्या काळात अनेक ग्राहकांना वाढीव वीज बिल रक्कम मोजावी लागली. त्यात कोरोना प्रादुर्भाव आजारामुळे सर्व नागरिकांची आर्थिक घडी विस्कटलेली आहे, असे असताना वीजबिलात सूट देण्याची घोषणा सरकारने केली. मात्र त्यानंतर आता महाविकास आघाडी सरकारने वीज बिल माफीच्या घोषणे वरून घुमजाव करीत सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणात वीजबिल पाठवून ती भरण्यासाठी सक्ती केली जात आहे.

सरकार जनतेचे मायबाप असते कोरोना संकटात जनतेच्या पाठीशी उभे राहण्याऐवजी या फसव्या महाआघाडी सरकारने वाढीव बिल दिली सरकारची ही भूमिका ग्राहकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करीत आहे. हे आघाडीचे नव्हे तर तिघाडीचे बिघाडी सरकार आहे. चालकाची भूमिकादेखील चलती का नाम गाडी अशी आहे.  मोघम वीज  बिले देणाऱ्या वीज मंडळाच्या अधिकार्‍यांनी जनाची नाही तर मनाची लाज राखायला हवी होती. त्यामुळे सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी आज वीज बिलांची होळी करून महाविकास आघाडी सरकारच्या दुटपी भूमिकेचा निषेध नोंदवला असल्याची माहिती भाजपा प्रदेश सचिव माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी दिली.

स्नेहलता कोल्हे म्हणाल्या, घरगुती वापराचे अनेकांना हजारो रुपये वीजबिल आले आहेत. तसेच बंद कारखानदार, दुकानदार यांना सुध्दा लॉकडाऊन काळात मोठ्या प्रमाणात वीजबिल आली आहेत. तर अनेक ठिकाणी मीटर तपासणी न करता ग्राहकांना मनस्ताप देणारे एवरेज बील पाठविण्यात आलीत. विजबिलात आकारणी केलेली रक्कम फार मोठ्या प्रमाणात आहे. ती किमान रक्कम कमी  केली तरी नागरिकांना दिलासा मिळू शकतो परंतु वचनपूर्ती न पाळणारे केवळ दिलासा देणारे आघाडीचे सरकार आहे. सत्तेसाठी एकत्र आलेले ही मंडळी कोणी रुसतो, तर कोण फुगतो एकमेकांची मनधरणी करण्यात त्यांचा वेळ जात आहे. या तडजोडीच्या सरकार पायी सामान्य माणूस भरडला जात आहे. कोरोना तपासणी असो की आरोग्य सुविधा याबाबत उशिरा निर्णय घेण्यामुळे सामान्य माणसाचा खिसा कापला जात आहे. एसटी कामगार यांनी आत्महत्या केल्यानंतर जागे झालेल्या सरकारने कसाबसा दोन तीन महिन्याचा पगार दिला आहे. प्रत्येक वेळी लोकांच्या आत्महत्येची वाट पाहणार का असा सवाल करून आता वाढीव वीज बिलाबाबत ही लोकांनी आत्महत्या  कराव्यात अशी सरकारची इच्छा आहे का ? असा संतप्त सवाल त्यांनी केला. गोळा बेरजेचे हे लोकांचे जीव घेणारे कोडगे सरकार असल्याची जोरदार टीका सौ. कोल्हे यांनी केली.

राज्यातील रिक्षा संघटना बहुतेक शिवसेनेच्या आहेत इतर राज्यांनी रिक्षाचालकांना पाच दहा हजार रुपयाची मदत केली. मात्र या  महाराष्ट्रातील आघाडी  सरकारने दमडीही रिक्षाचालकांना दिली नाही. जे त्यांचे आहेत त्यांचे हे सरकार होऊ शकले नाही. एकात एक नाही केवळ दिखावाच, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार, वीजबिलात माफी देणार अशा घोषणा करून लोकांच्या माथी वाढीव वीज बिल मारून केलेले पाप मोठे आहे, या पापाला देवही माफ करणार नाही. “आमच्या खिशात दमडी नाही आम्ही वीज बिल भरणारच नाही”. आम्ही हक्कासाठी भांडतो आणि हक्क मिळवणारच प्रसंगी आक्रमक आंदोलनाची वेळ आली तरी मागे हटणार नाही असा दृढनिश्चय  सौ. कोल्हे यांनी शेवटी व्यक्त केला.
सरकारने तातडीने वीज ग्राहकांना वीजबिल माफी देण्यात यावी या मागणीसाठी आणि सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी भाजपा प्रदेश सचिव सौ स्नेहलता कोल्हे यांनी भाजपचेवतीने आज सोमवारी (२३) रोजी सकाळी ११ वा. कोपरगाव शहरातील वीज वितरण कार्यालयासमोर चौकात वीजबिलांची होळी करत आंदोलन केले.
यावेळी भाजप प्रदेश सचिव माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे बरोबर भाजपा निरीक्षक अशोक पवार, शरद थोरात, साहेबराव रोहम, दत्ता काले, कैलास खैरे, विनोद राक्षे, स्वप्निल निखाडे, रवींद्र पाठक, केशव भवर जितेंद्र रणशूर, दिपक गायकवाड, अरुण येवले, आप्पासाहेब दवंगे, विजय वाजे, राजेंद्र सोनवणे, विद्या सोनवणे, दिपा गिरमे, मंगल आढाव, मच्छिंद्र केकान, मनीष गाढे, वसंतराव देशमुख, प्रदीप नवले, , शिवाजी आहेर, सुनील देवकर, बबलू वाणी आदीसह भाजपाचे पदाधिकारी नगरसेवक नागरिक शेतकरी मोठ्या संख्येने हजर होते.

चौकट
निवडून येण्याची दानत नसलेले दोन चार जण आपण पाडण्यासाठीच उभे राहिलो असल्याचे शेखी मिरवत असल्याचे पाहून त्यांची कीव येते.

Leave a Reply

You cannot copy content of this page