सन्मान निधी बंद : भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील,विरोधी पक्षनेते ना.देवेन्द्र फडणवीस शांत का? – विजय वहाडणे

सन्मान निधी बंद : भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील,विरोधी पक्षनेते ना.देवेन्द्र फडणवीस शांत का? – विजय वहाडणे

Honors fund closed

RajendraSalkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 17 Dec 2020, 16:00:00 

 कोपरगाव : राज्यात आलेल्या नविन सरकारने हा सन्मान निधी कुठलाही विचार न करता बंद केला आहे, या निर्णयामुळे सर्वच लाभार्थी संकटात सापडले असताना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील,विरोधी पक्षनेते ना.देवेन्द्र फडणवीस शांत का? असा सवाल नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे उपस्थित केला आहे.

या प्रसिद्धीपत्रकात वहाडणे यांनी म्हटले आहे की, आणीबाणीच्या कालखंडात ज्यांनी लोकशाहीच्या संरक्षणार्थ कारावास भोगला,यातना सहन केल्या त्या सर्वच कार्यकर्त्यांना युती शासनाच्या निर्णयानुसार “सन्मान निधी ” मिळायला सुरवात झाली होती. त्यासाठीही चार वर्षे पाठपुरावा करावा लागला होता.आणीबाणीविरुद्ध संघर्ष करणारे अनेकजण देवाघरी गेले, काहीजण वृद्धाकाळ-आजारपण यामुळे जर्जर झालेले आहेत.काहींच्या विधवा पत्नीही दुरावस्थेत रहात आहेत. सन्मान निधीमुळे त्यांना आर्थिक आधार मिळाला होता. पण दुर्दैवाने राज्यात आलेल्या नविन सरकारने हा सन्मान निधी कुठलाही विचार न करता बंद केला आहे,या निर्णयामुळे सर्वच लाभार्थी संकटात सापडले आहेत. ज्या कार्यकर्ते व स्वयंसेवकांनी वर्षानुवर्षे संघर्ष करून-लढे देऊन भारतीय जनता पक्षाला राज्य व केंद्रात सत्तेवर नेऊन बसविले,त्यांचा सन्मान निधी बंद झाला म्हणून भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी का आवाज उठविला नाही?इतर विषयांवर बोलत असतांना त्यांना मिसाबंदी स्वयंसेवक,सन्मान निधी याचा विसर पडला कि काय? सन्मान निधी मिळायला पुन्हा सुरवात व्हावी यासाठी तुम्ही प्रयत्न करावा अशी अपेक्षा आहे. तुम्ही तसा प्रयत्न करणार नसाल तर कार्यकर्ते पुन्हा संघर्ष करायला तयार होतील का? याचा गंभीरपणे विचार करावा अन्यथा त्याचे होणारे दुष्परिणाम सर्वांनाच भोगावे लागतील.सत्ता येते-जाते,पण संघटनेसाठी,विचारांसाठी पक्षासाठी निस्वार्थपणे कार्य करणारे कायम असतात,त्यांची काळजी घेणे आपले कर्तव्यच आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page