वकील संघाच्या ठरावाला पालिकेकडून केराची टोपली- ॲड . नितीन पोळ

वकील संघाच्या ठरावाला पालिकेकडून केराची टोपली- ॲड . नितीन पोळ

The decision of the lawyers’ association was taken by the municipality. Ad. Nitin Pol

वकिलांची गाळे बांधण्याची मागणी फेटाळली

RajendraSalkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 17 Dec 2020, 18:30:00

कोपरगाव : कोपरगाव नगर पालिकेने न्यायालय परिसरात गाळे बांधावे ही मागणी फेटाळून कोपरगाव वकील संघाच्या ठरावाला पालिकेकडून केराची टोपली दाखविण्यात आल्याचा आरोप लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष ॲड.नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे.

आपल्या पत्रकात  ॲड. पोळ पुढे म्हणाले, कोपरगाव शहरात जिल्हा व दिवाणी कनिष्ठ व वरिष्ठ स्तर तसेच सहकार न्यायालय असे सात न्यायालये आहेत त्याचप्रमाणे कोपरगाव वकील संघात सुमारे दोनशे पेक्षा जास्त वकील वकिली व्यवसाय करतात. सुमारे वीस वर्षांपूर्वी न्यायालय परिसरात जागा खरेदी करून काही वकिलांनी चेंबर अर्थात ऑफिस बांधकाम केले आहे. त्या ठिकाणी त्यांचे ऑफिस आहेत. मात्र त्या नंतर शहर व तालुक्यातील ग्रामीण भागातून अनेक वकील सभासद झालेले आहेत. मात्र या परिसरात नवीन वकिलांना ऑफिस करिता जागा उपलब्ध नाही. त्यामुळे या वकिलांना व्यवसाया करताना अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे वकील संघाने बैठक घेऊन व त्या बैठकीत ठराव करून नगरपालिकेकडे ऑफिस करिता गाळे बांधून देण्याचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र अनेक महिने उलटून गेले तरी नगर पालिकेने या प्रस्तावाकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. तसेच या परिसरात या पूर्वी पोलीस उपअधीक्षक कार्यालयास जागा देण्यात आली होती. मात्र सदर कार्यालय शिर्डी येथे झाले आहे. मात्र सदर जागा अद्याप नगर पालिकेने परत घेतली नाही. ती परत घेतल्यास व या परिसरात नगर पालिकेने गाळे बांधल्यास अनेक वकिलांना ऑफिस करता येईल, तसेच या परिसरात स्टेशनरी, झेरॉक्स,टायपिंग यासारखे व्यावसायिकांना देखील उपलब्ध होऊ शकतो. त्याच प्रमाणे नगर पालिकेला देखील आर्थिक उत्पन्न मिळू शकते.

Leave a Reply

You cannot copy content of this page