घरात घुसून अल्पवयीन मुलीचे अपहरण; धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ
Abduction of a minor girl
RajendraSalkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 23 Dec 2020, 19:30:00
कोपरगाव : गावातील एका घरातुन त्याने अल्पवयीन मुलीला कशाचे तरी आमिष दाखवून पळवून नेले .
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, रविवारी (ता.२०) ची घटना.. कोपरगाव तालुक्यातील उक्कडगाव गावात रात्रीच्या २०.३० ते २३.०० वा चे दरम्यान गावातील अल्पवयीन मुलीला अज्ञात आरोपीने फिर्यादी ची मुलगी हीच कशाचे तरी आमिष दाखवून अज्ञात कारणासाठी पळवून नेले आहे. अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. याप्रकरणी कोपरगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस गुन्हेगाराचा शोध घेत आहेत. मुलीच्या आईने कोपरगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावरुन अज्ञात आरोपीविरुद्ध अल्पवयीन मुलीचे अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस अज्ञात आरोपीचा शोध घेत आहे . कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉं. आर. एम. म्हस्के करीत आहे.