निवडणूका बिनविरोध का होत नाही ? – दौलतराव जाधव

निवडणूका बिनविरोध का होत नाही ? – दौलतराव जाधव

Why elections are not held without opposition? – Daulatrao Jadhav

RajendraSalkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 26 Dec 2020, 18:30:00

आचार संहिता पाळा शांतता समिती बैठकीत पोलिसांचा इशारा

कोपरगाव : गावच्या विकासासाठी जर कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन निवडणुका बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला तर गावचा कायापालट होऊ शकतो. परंतु तसे होत नाही अशी खंत कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी घारी येथे शांतता कमिटीच्या बैठकीत व्यक्त केली.

तालुक्यात सध्या २९ ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे.निवडणूक म्हटली की कार्यकर्त्यांमध्ये अतिउत्साह निर्माण होतो. निवडणुकीच्या काळात आचारसंहितेचे पालन करणे प्रत्येकाची जबाबदारी असते.प्रशासन कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आपल्या पातळीवर प्रयत्नशील आहे.परंतु जर कोणी निवडणुकीच्या काळात आचारसंहितेचे उल्लंघन केले तर त्याला कडक कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशारा पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी दिला. यावेळी पोलिस पाटील मिराताई रोकडे, ग्रामसेवक अशोक पाडेकर, अविनाश पवार ,आबा पवार ,अनिल पवार, धनाजी पवार ,नितिन पवार ,डाँ गोरक्षनाथ रोकडे, शांतिलाल पवार, शिवाजी बर्डे ,किसन पवार ,भानुदास होन आदि उपस्थित होते. कोपरगाव तालुक्यातील २९ ग्रामपंचायती पैकी घारी गावची निवडणूकही होत. निवडणूक जाहीर होताच गावांमध्ये राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली. पारंपरिक विरोधी काळे कोल्हे यांच्यासह शिवसेनेचाही गट निवडणुकीत आपले नशीब आजमावून पाहणार आहे. या पार्श्वभूमीवरच आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही याकरता कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशनच्या वतीने शांतता बैठक घेण्यात आली. निवडणुकीमध्ये मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी विविध पैलूंचा उपयोग केला जातो. ग्रामीण भाग म्हटला तरी लाखो रुपयांची उधळपट्टी निवडणूकीत केली जाते. चिरीमिरी वाटणारावर कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन लक्ष ठेवून आहे याचीची कल्पनाही पोलीस निरीक्षक जाधव यांनी दिली. शेवटी आभार शांतीलाल पवार यांनी आभार मानले…

Leave a Reply

You cannot copy content of this page