समता इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांची इन्स्पायर ॲवार्ड हॅट्रीक

समता इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांची इन्स्पायर ॲवार्ड हॅट्रीक

Inspire Award hat trick by the students of Samata International School

RajendraSalkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 27 Dec 2020, 16:00:00

कोपरगाव : इन्स्पायर ॲवार्डसाठी सलग तिसर्‍या वर्षीही समता इंटरनॅशनल स्कूलच्या तीन विद्यार्थ्यांच्या प्रकल्पांची निवड झाल्याने समता इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी इन्स्पायर ॲवार्ड हॅट्रीक साधली आहे.

भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभाग नवी दिल्ली तसेच नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन विभागांतर्गत विज्ञान विषयात आवड असलेल्या विद्यार्थ्यांना संशोधन क्षेत्रात करियर करण्यासाठी प्रेरणादायक संशोधन उपक्रम म्हणजे इन्स्पायर ॲवार्ड भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाद्वारे सन २०१० पासून प्रत्येक वर्षी हे प्रकल्प प्रदर्शन आयोजित केले जाते.
शुभ राजू मतसागर (इ ६ वी) ऑटो फ्लश टॉयलेट, अनय नितीन बोरणारे (इ ८वी) कोरोना वाॅच, पुष्कर धनंजय महाडिक (इ ७ वी) कोविड सिक्युरिटी डोअर या तीन विद्यार्थ्यांच्या प्रकल्पांची निवड झाली.निवड झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला दहा हजार रुपये बक्षीस म्हणून प्रदान करण्यात आले. विद्यार्थ्यांना विज्ञान विषय शिक्षक अनिस शेख व शाळेतील विज्ञान विभागाच्या सर्व शिक्षकांचे मोलाचे, अनमोल मार्गदर्शन लाभले.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे समता इंटरनॅशनल स्कूल चे संस्थापक अध्यक्ष काका कोयटे, मॅनेजिंग ट्रस्टी सौ. स्वाती कोयटे, मॅनेजिंग डायरेक्टर संदीप कोयटे, शैक्षणिक संचालिका सौ. लिसा बर्धन, उपप्राचार्य विलास भागडे, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या

Leave a Reply

You cannot copy content of this page