मनाविरुद्ध लग्न केल्याने आईचा आत्महत्येचा प्रयत्न
Attempted suicide
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 28 Dec 2020, 13:00:00
कोपरगाव : मुलीने मनाविरुद्ध लग्न केल्याने आईने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना कोपरगाव तालुक्यातील दहेगाव बोलका येथे घडली आहे. आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार शुक्रवारी (२५ डिसेंबर ) रोजी उघडकीस आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित मुलीने आई विरोधात फिर्याद दिली असून यात मुलीने म्हटले आहे की शुक्रवारी २५ रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास दहेगाव बोलका येथील आपल्या घरात आपल्या आईने मनाच्या विरुद्ध लग्न केल्याने त्याचा तीस राग येऊन घरात काहीतरी विषारी औषध सेवन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. असे म्हटले आहे, सदर यशोदा प्रतीक कुलकर्णी (२७) या मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून कोपरगाव ग्रामीण पोलिसांनी मुलीची आई सुमनबाई पंडितराव थोरे (५०) वर्ष रा. जांमळवाडी रोड, सिद्धिविनायक सोसायटी ,ऐश्वर्या हाईट फ्लॅट नं.०१ कात्रज पुणे यांच्या विरोधात गु.र.न.व कलम-l ५६४/२०२० भा द वी क ३०९ ५०६ प्रमाणे गुन्हा रजिष्टर दाखल केला आहे. कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ. म्हस्के हे पुढील तपास करीत आहेत.