माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांच्यामुळेच तळागाळात काम करण्याची ऊर्जा मिळाली-ना. रामदास आठवले
Former Minister Shankarrao Kolhe gave him the energy to work at the grassroots. Ramdas Athawale
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 28 Dec 2020, 13:00:00
कोपरगाव : सहकार क्षेत्रात साखर कारखाना चालवितांना शेतकरी, मजुर, उसतोडणी कामगार, गोरगरीब आणि दिनदलितांसह सर्वच जाती धर्माच्या लोकांसाठी काम करणारे माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांच्या सोबत काम करण्याची आम्हांला संधी मिळाली, त्यांच्या सहवासात आम्ही घडत गेलो, समाजातील तळागाळापर्यंतच्या घटकांसाठी काम करण्याची उर्जा त्यांच्यामुळेच मिळाली असल्याचे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी कोपरगाव संजीवनी कार्यस्थळावर केले . यावेळी संजीवनी उदयोग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे माजी आमदार तथा भाजपा प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी त्यांचे स्वागत करून सत्कार केला.
यावेळी कोपरगाव विधानसभा मतदार संघातील विविध समस्या मांडून विकास कामांसाठी निधी देण्याची मागणी केली. त्यामध्ये मतदार संघातील दलितवस्ती अंतर्गत रस्ते तसेच समाज मंदिर कामासाठी निधी दयावा, राज्य सरकारने अनुसूचित जातीच्या विदयाथ्र्यांची कमी केलेली शिष्यवृत्ती वाढवून दयावी, विविध महामंडळाच्या माध्यमातून वितरीत करण्यात येणा-या कर्जाची मर्यादा वाढवावी, भारतरत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबई येथील आंतरराप्ट्रीय स्मारकाचे कामाचा लवकर शुभारंभ करावा, केंद्र सरकारची नविन उदयोग सुरू करण्यासाठी स्ट्रर्टअप योजना ही शासनाच्या समाजकल्याण विभागामार्फत राबविण्यात यावी. पीएमइजीपी या योजने अंतर्गत अनुसूचित जाती जमातीतील नागरीकांना मिळत असलेल्या कर्जाच्या बाबतीत ज्या काही जाचक अटी सरकारने घालुन दिल्या, त्या शिथिल कराव्यात.अशा विविध मागण्या या निवेदनात केल्या. यावेळी ना.आठवले म्हणाले, गेल्या पाच वर्षाच्या काळात सौ. कोल्हे यांनी मतदार संघातील जनतेला ख-या अर्थाने न्याय देण्याचे काम केले आहे. कोल्हे साहेबांचा वारसा त्या चालवत असल्याने समाजातील तळागाळातील घटकांसाठी सौ. कोल्हे यांचे काम सुरू असल्याचेे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देशाचा विकास करून समाजाला न्याय देण्याच्या मिशनमध्ये मला दुस-यांदा संधी मिळाल्याने समाजाला न्याय देण्याचे, समाजात परिवर्तन करण्याच्या कामाला गती आली असल्याचेही ना.आठवले यावेळी म्हणाले. बिपीनदादा कोल्हे यावेळी म्हणाले, सामाजिक चळवळीच्या माध्यमातून तळागाळातील घटकांना बरोबर घेउन ना.आठवले यांनी आपला कतृत्वाचा आलेख उंचावला. महाराष्ट्रातीलकानाकोपर-यातील, घरा-झोपडीतील कार्यकर्त्यांना ओळखण्याचे त्यांचे कसब आणि गावखेडयात जाउन समस्यां समजून घेण्याची पध्दत यामुळेच कोणतीही राजकीय पाश्वभूमीवर नसतांना त्यांना उच्च पदावर घेउन गेली. कार्यकर्त्यांना जीवापाड जपणारा माणूस आणि त्यांच्यावर प्रचंड विश्वास टाकणारा ना. आठवले हे एकमेव नेता असल्याचे कोल्हे यावेळी म्हणाले. त्यांच्या भाषणाची आगळी वेगळी शैली प्रत्येकाला भावते त्यामुळेच ते लोकप्रिय आहेत. यावेळी सुमित कोल्हे, आरपीआयचे प्रदेश सचिव विजय वाकचौरे, जिल्हा संपर्कप्रमुख श्रीकांत भालेराव, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष राजाभाउ कापसे, दिपक गायकवाड, जितेंद्र रणशुर, उपनगराध्यक्ष स्वप्निल निखाडे, भाजपा शहराध्यक्ष दत्ता काले, भाजयुमाचे शहराध्यक्ष अविनाश पाठक, आदीसह भाजपा, आरपीआयचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. चौकट – राजकारणामध्ये ज्यांचे अनेक वेळा घ्यायचो सल्ले, त्यांचे नाव आहे, शंकरराव कोल्हे. या चारोळीने त्यांनी आपल्या भाषणाला सुरूवात केली. तर माझ्या लग्नाच्या वेळी कोल्हे यांनी लाडू वाटले, म्हणून त्यांच्या विषयी माइया मनात प्रेम साठले .