संचारबंदी मोडली; अपक्ष नगरसेवकावर गुन्हा दाखल

संचारबंदी मोडली; अपक्ष नगरसेवकावर गुन्हा दाखल

कोपरगाव :
शुक्रवारी रात्री पावणे आठ वाजेच्या सुमारास करोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांतर्गत लागू संचारबंदी, मोडल्याप्रकरणी कोपरगाव नगरपालिकेचे अपक्ष नगरसेवक यांच्यावर कोपरगाव शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

कोपरगाव शहरामध्ये सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत संचारबंदी शिथिल करण्यात आलेली आहे असे असताना शासनाचा आदेश झुगारून
अपक्ष नगरसेवक मेहमुद मनोहर सय्यद रा. साईनगर, हे शुक्रवारी तीन जुलै रोजी रात्री पावणे आठ वाजेच्या सुमारास आंबेडकर चौक येथे त्यांचे पासुन मानव जिवाला व आरोग्याला किंवा सुरक्षीततेला धोका होईल हे त्यांना माहीत असुन देखील त्याने विनाकारण गर्दी करुन समाजास धोका पोहचेल असे कृत्य केले.

तसेच त्यांनी मा. जिल्हादंडाधिकारी सो. अहमदनगर यांचे कडील आदेश क्रमांक आ.व्य.म.पु/कार्या/19 अ/1046/2020 अन्वये कोरोना विषाणु (कोविड 19) प्रदुर्भाव रोखन्यासाठी साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 अन्वये निर्गमित केलेल्या आदेशाचे तसेच संचार बंदी आदेशाचे उल्लघंन करुन, विना मास्क, विना हेल्मेट, सोबत वाहनाचे कागदत्रे न बाळगता त्याचेकडील मोटारसायकलवरून कोपरगाव शहरात फिरताना मिळुन आले वगैरे मजकुरचे फिर्यादीवरुन कोपरगाव शहर पोलिसांनी गु. रजि. नं 243/2020 भादवि कलम भा. द. वी. कलम 188(2),186, 269, 270, 290, 271, मो. वा. का. क. 250(2)/177, 130/177, प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे शहर पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पो.हे.कॉ. डी.आर. तिकोणे करीत आहे

Leave a Reply

You cannot copy content of this page