कोपरगावात कोरोनाग्रस्तांची संख्या ८; आणखी दोघांना लागण

कोपरगावात कोरोनाग्रस्तांची संख्या ८; आणखी दोघांना लागण

– बांधितांमध्ये चार पुरूष, चार महिला

कोपरगाव सद्यस्थिती (update)
स्वॅब तपासणी ७० ते ७५ करण्यात आली मात्र त्यातील ५५ ते ६० जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.आजकोरोनाग्रस्तांची संख्या १४ झाली असून ६ जण कोरोना मुक्त झाल्याने आज केवळ आठ जण उपचार घेत आहे तर २१ जणांचे स्वॅब तपासणी साठी जिल्हा रुग्णालयाकडे पाठविण्यात आली आहे .

कोपरगाव

कोपरगाव येथील कोविड रुग्णालयात कोरोना संशयित म्हणून स्वॅब घेण्यात आलेल्या २० रुग्णांपैकी १८ रुग्णांचे तपासणी अहवाल आज प्राप्त झाले. राहिलेल्या दोन जणांचे कोरोना तपासणी अहवाल “पॉझिटिव्ह’ आल्याने कोपरगाव शहरात कोरोना लागण झालेल्या रुग्णांची संख्या आठ इतकी झाली आहे. शनिवारी आणखी २१ जनांचे स्वॅब तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संतोष विधाटे यांनी दिली

अधिक माहिती देताना ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कृष्णा फुलसौंदर म्हणाले, आज प्रात झालेल्या अहवालात कोरोनाग्रस्त डॉक्टर यांच्या दवाखान्यातील नर्स व मुंबईच्या जावयाचा मुलगा हे दोघेही कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत त्याचबरोबर डॉक्टर कुटुंबीयांच्या व मुंबई जावयाच्या संपर्कात आलेल्या आणखी २१ जणांचे स्वॅब शनिवारी
जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

कोरोना ग्रस्त आठ जणांमध्ये डॉक्टर कुटुंबियातील पाच व नर्स या सहा जणांचा तर मुंबईचा जावई व त्याचा मुलगा या दोघांचा समावेश आहे. कोरोनाग्रस्त मध्ये चार महिला व चार पुरुष यांचा समावेश आहे . यामुळे उपचार घेत असलेल्या तालुक्यातील कोरोना बधितांची संख्या ८ झाली आहे.

८ आठपैकी दोन जणांवर नगर येथे तर सहा जणांवर एस एस जी एम कॉलेज मुलींचे वसतिगृह येथील कोविड सेंटर येथे उपचार सुरू आहेत यावेळी कोविड सेंटर येथे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ संतोष विधाटे कोपरगाव ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधिकारी डॉ कृष्णा फुलसौंदर व विशेष वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वैशाली बडदे याही रुग्णावर लक्ष ठेवून आहेत.

कोपरगावात कोरोनाबधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आवागमन करणाऱ्या नागरिकांमुळे हा आकडा वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कोपरगावकरांची चिंता वाढत चालली आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page