कोपरगाव बाजार समितीचे शेतकरी भाजीपाला मार्केट – सभापती रक्ताटे
शेतकरी ते ग्राहक अशी थेट विक्री उपसभापती निकोले यांची माहिती
दररोज सकाळी ९ ते ५ ; शनिवार बंद
कोपरगाव :
शेतकऱ्यांनी पिकवलेला भाजीपाला, फळे, धान्य थेट बाजारात आणून नागरिकांना माफक दरात ते मिळाले पाहिजे या उद्देशाने कोपरगाव बाजार समितीने बैलबाजार येथील शेडमध्ये शेतकऱ्यांना जागा उपलब्ध करून दिली असल्याची माहिती सभापती संभाजी रक्ताटे यांनी दिली.
तर मध्यस्थांचा अडथळा दूर होऊन शेतकरी ते ग्राहक अशी थेट विक्री होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे त्यातून शेतकरी व ग्राहक अशा दोघांनाही फायदा होण्याची त्यातून संधी आहे. असा भावना असा आशावाद असा आशावाद उपसभापती राजेंद्र निकोले यांनी यावेळी व्यक्त केला.
राज्य शासनाने संत शिरोमणी सावता माळी शेतकरी बाजार अभियान राबवण्याचा निर्णय घेऊन शासनाने त्या संबंधीचे परिपत्रक काढले. हे अभियान राबविण्याचे दिवसापासून बाजार समितीच्या विचाराधीन होते त्यात काही शेतकऱ्यांनी याबाबत सातत्याने बाजार समितीकडे पाठपुरावा केला होता. परंतु शुक्रवारी (३ जुलै) रोजी शेतकऱ्यांना नगरपालिकेने बसू न दिल्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी थेट बाजार समितीमध्ये येऊन या आंदोलनाचा पवित्रा घेतला. तेव्हा बाजार समिती सभापती व संचालक मंडळांनी ताबडतोब बैठक घेऊन शेतकरी भाजीपाला मार्केट ला जागा देण्याचा ठराव मंजूर केला व तातडीने बैलबाजार येथील शेडमध्ये या शेतकऱ्यांना जागा दिली व शेतकरी भाजीपाला मार्केट चा शुभारंभ बाजार समितीचे सभापती संभाजी रक्ताटे यांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आला .
यावेळी बोलताना सभापती संभाजी रक्ताटे म्हणाले, या बाजारात फक्त शेतकरीच ताजी फळे, भाजीपाला व शेतमालाची विक्री करू शकणार आहेत. याशिवाय या बाजारात शेतकरी, शेतकऱ्यांचे गट, शेतकरी उत्पादक कंपन्या आणि शेतकरी उत्पादक सहकारी संस्थांचे सदस्यच शेतमाल विक्रीसाठी आणू शकतील. शेतकरी आणि ग्राहक यांच्यामध्ये दलालाची साखळी नसल्याने शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळेल व नागरिकांना माफक दरात चांगला शेतमाल मिळेल. असेही ते म्हणाले
हे मार्केट सुरू व्हावे यासाठी विजय सुधाकर जाधव सुनिल अंबादास देवकर वसंत मालकर मच्छिंद्र मालकर राजेंद्र देवकर नामदेवराव घायतडकर या शेतकऱ्यांनी सातत्याने पाठपुरावा केला असल्याची माहिती सचिव परसराम सिनगर यांनी दिली
प्रतिक्रिया
शेतकरी बाजारातील भाजीपाला दर्जेदार असतो. तो टिकतोही चांगला. अन्य बाजारांच्या तुलनेत येथे व्यवस्थित दरांत आम्हा ग्राहकांना माल मिळतो.– शेवंताताई, गृहिणी
शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाला परवडणारा दर व ग्राहकांना वाजवी दरात शुद्ध, स्वच्छ भाजीपाला, फळे, धान्य मिळावे यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. शेतकरी गटांचाही सहभाग वाढविण्याचा प्रयत्न आहे. आधी लिलावला भाजीपाला न्यायचो. त्या वेळी थेट विक्री करीत नव्हतो. स्वत: विक्री केल्यास दर चांगले मिळू शकतात हे या बाजारात अनुभवण्यास मिळालं. हळूहळू ग्राहकांशी नाळ जुळेल आहे. काही वेळा विक्रीत तारांबळ उडाली तर ग्राहक आम्हाला मदत व सहकार्य करतात. ताजा माल असल्याने ग्राहकाला संतोष वाटतो.– शेतकरी विजय सुधाकर जाधव,
अन्य बाजारांपेक्षा येथे दीडपट ते दुप्पटीने पैसे मिळू लागले. मालाची प्रतवारी करण्याची सवय लागली. चांगल्या प्रतीचा माल पुरविल्याने ग्राहकही आमच्याकडून आनंदाने खरेदी करू लागले.- भाजीपाला विक्रेते सुमनबाई