जागतिक सहकार दिनी; समताची सहकार सुगंध अगरबत्ती – कोयटे

जागतिक सहकार दिनी; समताची सहकार सुगंध अगरबत्ती – कोयटे

 

समताचे सबकुछ सहकार

 

कोपरगाव :जागतिक सहकार दिनाचे औचित्य साधून समता महिला बचतगट उत्पादित समता सहकार सुगंध(एस ३)अगरबत्ती व कापुराचा विशेष विक्री वृद्धी योजनेचा शुभारंभ करण्यात आला असल्याची माहिती समता पतसंस्थेचे चेअरमन ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी दिली.

सहकार समताच्या नसानसात स्व. यशवंतराव चव्हाण सहकार सभागृह आणि स्व. यशवंतराव चव्हाण सहकार मार्ग असे नाव देण्यात आलेले आहे.समता महिला बचतगट निर्मित अगरबत्ती व कापूराच्या नावातही समता व सहकाराचा सुगंध असून समताचे सबकुछ सहकार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तर गुणवत्तेमुळे शहर व ग्रामीण भागात विक्री वृद्धीतून दरवळत आहे. खरेदीपासून लाभ यासाठी जागतिक सहकार दिनी समता महिला बचतगटअंतर्गत समता सहकार सुगंध (एस ३) अगरबत्ती व कापुर विशेष विक्री वृद्धी योजनेचा शुभारंभ ४ जुलै २०२० रोजी स्व. यशवंतराव चव्हाण समता सहकार सभागृहात काका कोयटे यांचे शुभहस्ते करण्यात आला.

 

या प्रसंगी समता पतसंस्थेचे संचालक सर्वश्री.अरविंद पटेल, जितुभाई शहा, रामचंद्र बागरेचा, चांगदेव शिरोडे, संदीप कोयटे, कचरू मोकळ, संचालिका सौ.शोभा दरक यांची प्रमुख उपस्थिती होती.

 

कोपरगाव शहरातील प्रसिद्ध व्यापारी कैलास जंगम यांनी या योजनेत सहभागी होत समता पतसंस्थेचे संचालक श्री.चांगदेव शिरोडे यांचे शुभहस्ते १३,५०० रुपयांचा माल स्वीकारला. या योजेनेचे त्यांना कुपन देण्यात आले.

 

या योजनेविषयी अधिक माहिती देतांना समता महिला बचतगट निर्मित समता सहकार सुगंध अगरबत्ती व कापूर उत्पादन विभागाचे श्री.विश्वास सावरगावकर यांनी सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले कि, या योजनेचा शुभारंभ १ जुलै २०२१ पर्यंत कालावधी असणार आहे. या योजनेत ३०० खरेदीदार, व्यापारी सहभाग होऊ शकतात. सहभागी झालेल्या प्रत्येक खरेदीदार व्यापारी याने १३,५०० रुपयांचा माल खरेदी करून त्याला कुपन देण्यात येणार आहे. आणि त्यानंतर आदर्श खरेदीदार, व्यापारी, ग्राहकाची निवड केली जाणार आहे.

 

या योजनेत सहभागी होणाऱ्या व्यापाऱ्यांनी दिलेल्या कालावधीनंतर आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहे. त्यामध्ये प्रथम क्रमांकासाठी हिरो सी डी डॉन संख्या १, द्वीतीय क्रमांकासाठी टी.व्ही. एल. सी. डी. संख्या १, तृतीय क्रमांकासाठी इलेक्ट्रोनिक वजनकाटा संख्या ५, चतुर्थ क्रमांकासाठी इंडक्शन स्टोव्ह संख्या १०, पाचव्या क्रमांकासाठी टेबल पंखा संख्या २० तर सहाव्या क्रमांकासाठी चार्जिंग टॉर्च आदि बक्षिसांचा समावेश करण्यात आलेला आहे.
या योजनेत सहभागी होणेसाठी समता पतसंस्थेतील समता सहकार सुगंध (एस ३) अगरबत्ती व कापुर उत्पादन विभागाशी संबंधीत व्यापारी ग्राहक खरेदीदार यांनी संपर्क साधावा.

Leave a Reply

You cannot copy content of this page