महाराष्ट्रातील तीन पक्षाचे सरकार दिशाहिन – स्नेहलता कोल्हे
महाराष्ट्र देशात कोरोनात क्रमांक एकचे राज्य झाले झाले, ही अत्यंत वाईट गोष्ट आहे.
कोपरगाव :
कोरोना संकटात महाराष्ट्रातील तीन पक्षाचे आघाडी सरकार पूर्णपणे दिशाहीन ठरले आहे, अशी जोरदार टीका भाजपाच्या प्रदेश सचिव माजी आ. सौ. स्नेहलता कोल्हे यांनी केली आहे.
“कोरोना’शी लढण्यास केंद्र महाराष्ट्र सरकारला पूर्णपणे मदत करीत आहे. मात्र महाराष्ट्रात कोरोना रूग्णांची अवस्था अत्यंत बिकट आहे. रुग्णांची हेळसांड, त्यांना तब्बल 16 तास ऍम्बुलन्स उपलब्ध होत नाही.खाजगी दवाखान्यामध्ये होणारी आर्थिक लुट, कुठे व्हेंटीलेटर नाहीत तर कुठे टेस्ट वेळेवर होत नाही. अशाप्रकारची अतोनात हाल कोविडच्या रुग्णांची होत असल्यामुळे या रोगाशी लढण्यास महाराष्ट्रातील सरकार अपयशी ठरल्याचा ठपकाही सौ. कोल्हे यांनी ठेवला.
दिनांक ३ जुलै रोजी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी माजी आ. स्नेहलता कोल्हे यांची प्रदेश सचिव पदासाठी निवड करण्यात आल्याबद्दल पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी सामाजिक अंतर ठेवुन सन्मान करण्यात आला त्याप्रसंगी बोलत होत्या.
प्रदेश सचिव सौ. कोल्हे म्हणाल्या, शिस्त आणि जनकल्याणाचा वारसा असलेल्या पक्षाने माझी निवड करुन मला मोठी संधी दिली आहे. उद्याचा उज्वल महाराष्ट्र व भारताचे भवितव्य घर घेण्यासाठी ही विचारधारा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवावी लागेल. पक्षाचे विचार तळागाळापर्यंत पोहचविण्याचे पक्षसंघटना जास्तीत जास्त मजबुत करण्यावर भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले .





