कोपरगाव- येवला – नाशिक विनापरवानगी प्रवास; बाप लेकावर गुन्हा
कोपरगाव :
प्रशासनाची कोणतेही परवानगी न घेता
विनापरवानगी प्रवास करून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी बाप लेक या दोघांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी कोपरगाव ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कृष्णा फुलसौंदर यांनी दिलेल्या लेखी पत्रावरून गुन्हा दाखल झाला आहे.
करोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी जिल्हा प्रशासनाकडून जिल्हाबंदी आदेश दिले आहेत. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांच्या या आदेशाचा भंग आरोपी रामनाथ कोंडाजी मेमाने (७२), डॉ. अमरिश रामनाथ मेमाने (४५) या बाप लेकाने केल्याचे समोर आले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आरोपी रामनाथ कोंडाजी मेमाने (७२), हे (१९ जुन) रोजी अहमदनगर जिल्हयातील कोपरगांव येथुन नासिक जिल्हयातील येवला येथे गेले होते. तसेच आरोपी डॉ.अमरिश रामनाथ मेमाने (४५) हा (२३जून) रोजी अहमदनगर जिल्हयातील कोपरगांव येथुन नासिक येथे गेला होता.
अशाप्रमाणे या दोघांनी मा. जिल्हाधिकारी अहमदनगर यांचे जिल्हाबंदी आदेशाचे उल्लंघन करुन कोणताही वैध शासकीय पास न घेता प्रवास केलेने त्यांना कोरोना विषाणु संसर्ग होवुन त्यांचे संपर्कातील व्यक्तींना देखील कोरोना विषाणु संससर्ग होवुन मानवी जिवीतास धोका निर्माण झाला असल्याची पोकॉ. 2611 रामकृष्ण गोरख खारतोडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन सदरचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेका. 1777 डी आर तिकोणे करीत आहे.





