डिजिटल आंदोलन : कोपरगाव च्या पाण्यासाठी जनतेचा असाही एक लढा – राजेश मंटाला
Digital Movement: Such a struggle of the people for the water of Kopargaon – Rajesh Mantala
करूया एक ई-मेल आणि सोडुया आपली समस्या आपणच
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 21Jan 2021, 20:20:00
कोपरगाव : कोपरगाव तालुक्याच्या व शहराच्या पिण्याच्या पाण्याची समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी थेट नांदूर-मधमेश्वर धरणातून पाईपलाईन द्वारे शहराला दररोज पाणी पुरवठा व्हावा यासाठी केंद्र शासन व राज्य शासन यांना ही समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी दिनांक २४ ते २६ जानेवारी दरम्यान प्रत्येक नागरिकाने ई-मेल करून डिजिटल आंदोलन द्वारे तक्रार करायची असून त्यासाठी सर्वांनी सहभागी होऊन इतरांनाही प्रोत्साहित करावे असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते राजेश मंटाला यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.
याआधी त्यांनी शहरालगत असलेल्या जेऊर पाटोदा हद्दीतील रस्ता व गटार बरेच वर्षांपासून होत नव्हते त्यासाठी त्यांनी पंतप्रधान कार्यालयाकडे तीन वर्षापूर्वी रीतसर तक्रार करून सामान्य जनतेला न्याय मिळवून दिला होता त्यानंतर त्या रस्ता व गटारीचे काम मार्गी लागले होते कोपरगाव च्या पाणी प्रश्न त्यांनी औरंगाबाद उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे दूरदर्शन व टीव्हीच्या माध्यमातून मॅन फोर्स कंडोम व इतर अश्लिल जाहिराती दाखवल्या जायच्या याबाबतही त्यांनी पंतप्रधान कार्यालयाकडे ई-मेल द्वारे तक्रार बंद करण्याचा आदेश काढायला भाग पडले होते राज्य व केंद्र शासनाचे दार ठोठावून न्याय मिळवला येतो आता त्यांचा लढा पाण्यासाठी सुरू झाला आहे नागरिकांनी त्यात २४ ते २६ जानेवारी तारखेच्या दरम्यान पंतप्रधान कार्यालयाकडे ई-मेल करून आपली तक्रार नोंदवावी असे आवाहन त्यांनी केले आहे.
Post Views:
362