लाईट बिल भरण्यासाठी तिन टप्प्यांची सवलत द्या-  सतिष  काकडे

लाईट बिल भरण्यासाठी तिन टप्प्यांची सवलत द्या-  सतिष  काकडे

Give a three step concession to pay the light bill- Satish Kakade

मनसेचा  तिव्र आंदोलनचा इशारा    MNS warns of intense agitation

कोपरगाव :   वीज महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी  कोरोना काळातील थकीत लाईट बिल भरण्यासाठी आदेश जारी करून पठाणी वसुली सुरु केली आहे.ती  थांबवून शहर व ग्रामीण भागातील नागरिकांना लाईट बिल भरण्यासाठी तिन टप्प्यांची सवलत द्या अशी मागणी एका निवेदनाद्वारे मनसेच्या वतीने शहराध्यक्ष सतीष काकडे यांनी केली असून सदर मागणी मान्य न झाल्यास मनसेच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशाराही मनसेच्या वतीने देण्यात आला आहे.

सदर निवेदन विज महावितरण कंपनी कोपरगाव शहर व तालुका यांना  देण्यात आले आहे.यावेळी मनसे शहराध्यक्ष सतिष.   काकडे, अनिल गाडे, विजय सुपेकर ,  रघुनाथ मोहिते, हिंदु सम्राट संघटना संस्थापक बापू काकडे,  जावेद शेख, आनंद परदेशी, संजय जाधव, नवनाथ मोहिते,बंटी सपकाळ, सचिन खैरे, अनिकेत खैरे आदि मनसैनिक उपस्थित होते.
  
या निवेदनात म्हटले आहे की, लोकांना व्यवस्थित काम धंदा नाही व्यवसाय सुरळीत चालत नाही त्यामुळे घराच्या परिवाराचा गाडा ओढणे अवघड झालेले   असताना  आठ महिन्यापासून वाढीव वीज बिला बरोबर व्याजाच्या टक्केवारीने फुगलेली बिले भरण्यासाठी शब्द देऊन कुठेही सरकारने वीज बिलात सवलत दिलेली नाही त्यामुळे जनतेत असंतोष निर्माण झालेला असून देखिल लाईट बिल भरण्यास लोक तयार आहे परंतु आपण सर्व नागरिकांच्या परिवाराचा विचार करून सदर बिलामध्ये कमीत कमी तीन टप्पे करून सदर लाईट बिल भरून घेण्याचे सहकार्य करावे.अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोपरगाव शहर व तालुक्याच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असे दिलेल्या निवेदनातून म्हटले आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page