मतदानाचा पवित्र हक्क बजावत रहा – तहसिलदार योगेश चंद्रे

मतदानाचा पवित्र हक्क बजावत रहा – तहसिलदार योगेश चंद्रे

Keep exercising your sacred right to vote – Tehsildar Yogesh Chandre

११ वा राष्ट्रीय मतदार दिवस 11th National Voters’ Day

कोपरगाव : लोकशाही बळकट करण्यासाठी मतदार महत्वाचा घटक असून नवं मतदारांनी मतदार यादीत नाव असल्याची वेळोवेळी खात्री करुन वेळोवेळी होणाऱ्या निवडणूक प्रक्रियेत मतदानाचा पवित्र हक्क जरुर बजावत रहावा असे आवाहन तहसिलदार योगेश चंद्रे यांनी तहसिल कार्यालयात निवडणुक शाखेचा  ११ व्या राष्ट्रीय मतदार दिनाच्या कार्यक्रमात  व्यक्त केले.

यानिमित्ताने श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी जनजागृती फलक घेऊन सहभाग घेतला.तसेच तहसिलदार योगेश चंद्रे यांनी त्यांना शपथ दिली. याप्रसंगी मुख्याध्यापक मकरंद  कों-हाळकर , दिलीप तुपसैंदर रमेश गायकवाड, रघुनाथ लकारे, निलेश बडजाते, अतुल कोताडे, बलभीम ऊल्हारे,दत्तात्रय विरकर,अनिल काले, योगेश गवळी, राहुल चौधरी, श्रीकांत डांगे यांचे सह शाळेचे विद्यार्थी-विद्यार्थीनी उपस्थित होते. सुत्रसंचलन समन्वयक सुशांत घोडके यांनी केले.तर आभार निवडणूक शाखेचे अरुण रणनवरे यांनी मानले.

Leave a Reply

You cannot copy content of this page