कोपरगावमध्ये कोरोना लसीचा पहिला डोस डॉ. वैशाली बडदेंना
The first dose of corona vaccine in Kopargaon was given by Dr. Vaishali Baddenna
कोरोना प्रतिबंध लस पुर्णपणे सुरक्षित- डॉ. वैशाली बडदे Corona prevention vaccine is completely safe- Dr. Vaishali Badde
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 25Jan 2021, 16:00:00
कोपरगाव : कोरोना लसीची प्रतीक्षा संपून, आता लसीकरणाला प्रत्यक्ष सुरवात झाली आहे. कोरोना लसीकरण मोहिमेस आज सोमवारी (२५) रोजी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात सुरवात झाली.कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाच्या विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे यांना ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कृष्णा फुलसौंदर यांनी प्रथम लसचा पहिला डोस देऊन प्रारंभ करण्यात आला. प्रारंभी तहसीलदार योगेश चंद्रे, व कोपरगाव IMA अध्यक्ष डॉ. महेंद्र गोंधळी यांच्या हस्ते धन्वंतरी पूजन व फीत कापण्यात आली.
यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष विधाते, डॉ.अजेय गर्जे, डॉ.विजय क्षीरसागर, डॉ.राजेश माळी,डॉ.गोवर्धन हुसळे, डॉ.बन्सिधर ढाकणे, वैद्यकीय अधिकारी डॉ.अनिरुद्ध तोडकर, डॉ.आतिष काळे,डॉ.जितेंद्र रणदिवे,डॉ.मेघा गोंधळी, डॉ.संदिप वैरागर,सुशांत घोडके, सचिन जोशी, घनशाम शिंदे, आरोग्य सेविका नंदू नवले,सपना पठारे,पुनम नेटके,गाणार,जाधव आदी उपस्थित होते.
डॉ. कृष्णा फुलसौंदर म्हणाले , संकटात आरोग्य यंत्रणेने बजावलेली भूमिका महत्त्वपूर्ण असून, पहिल्या टप्प्यात “फ्रंटलाइन वर्कर’ म्हणून
तालुक्यातील सर्व डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात येत आहे.
दुसऱ्या टप्प्यात कोपरगाव तालुक्यातील अधिकारी व कर्मचारी यांना लस देण्यात येणार आहे. ग्रामिण रुग्णालय कोपरगाव येथे दररोज सकाळी ०९:०० ते दुपारी ०५:०० वाजेपर्यंत लसीचे १०० डोस दिले जाणार असल्याची माहिती वैद्यकीय अधिक्षक डॉ. कृष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे.
अधिक माहिती देताना डॉ. कृष्णा फुलसौंदर म्हणाले, लसीकरण नोंदणी,प्राथमिक तपासणी,प्रत्यक्ष लसीकरण, निरीक्षक कक्ष असे स्वतंत्र दालन करण्यात आले आहे. लस घेतलेल्या व्यक्तीचे ३० मिनिट निरीक्षण कक्षात करण्यात येणार आहे. त्यानंतरही एखाद्या व्यक्तीस काही विपरीत परिणाम जाणवू लागल्यास तशी अतिदक्षता व्यवस्था विभाग अशी व्यवस्था करण्यात आली असून हे काय ही मोहीम सुरू झाली.
लसीकरण केंद्रावर सुशोभिकरण करण्यात आले असून सेल्फी पाॅईंट उभारण्यात आला आहे.
पहिली लस घेण्याचा मान मिळालेल्या विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ.वैशाली आव्हाड (बडदे) लस घेतल्या नंतर म्हणाल्या,कोरोना प्रतिबंध लस पुर्णपणे सुरक्षित आहे.त्या विषयी अफवा गैरसमज पसरु न देता आत्मविश्वासाने प्रत्येकाने लस घेणे गरजेचे आहे.असे सांगितले.