कोपरगाव मध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
Republic Day celebrations in Kopargaon
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 26Jan 2021, 18:30
प्रजासत्ताक दिन 2021 : कोपरगाव :
कोपरगाव येथे विविध कार्यक्रमांनी प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. तहसीलदार योगेश चंद्रे यांच्या हस्ते शासकीय झेंडावंदनाचा मुख्य कार्यक्रम येथील तहसीलदार कार्यालय मैदानावर पार पडला.
राष्ट्रगीतानंतर चंद्रे यांनी या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व संचलन पथकाचे निरीक्षण केले. पथकात शहर पोलीस पथक, होमगार्ड पथक, एनसीसी पथक, स्काउट गाईड, अग्निशमन दल, आरोग्य पथक, आरोग्य विभाग यांचा समावेश होता. यानंतर सर्व पथकांनी संचालनाद्वारे प्रमुख पाहुण्यांना मानवंदना दिली.
कोपरगाव शहर व परिसरातील विविध शाळांनी सांस्कृतिक कार्यक्रम व विविध प्रात्याक्षिके सादर केली.
कर्मवीर शंकरराव काळे कारखाना अध्यक्ष आमदार आशुतोष काळे, सहकार महर्षी शंकरराव कोल्हे कारखाना अध्यक्ष बिपीन कोल्हे, संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेज कार्याध्यक्ष नितीन दादा कोल्हे, गोदावरी बायो रिफायनरी संचालक एस. मोहन, गोदावरी दुध संघ अध्यक्ष राजेश परजणे, औद्योगिक वसाहत विवेक कोल्हे, कोपरगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासक नामदेव ठोंबळ, कोपरगाव जिल्हा न्यायालय न्यायमूर्ती आर. बी. भागवत, दिवाणी व फौजदारी न्यायालय वरिष्ठ स्तर न्यायमूर्ती सचदेव मॅडम, पाटबंधारे विभाग शाखा अभियंता सचिन ससाने सार्वजनिक बांधकाम विभाग उप अभियंता प्रशांत वाकचौरे, कोपरगाव बस स्थानक आधार प्रमुख अभिजित चौधरी, सद्गुरू गंगागिरी कॉलेज प्राचार्य डॉ. शंकरराव थोपटे, सोमय्या कॉलेज अध्यक्ष अशोक रोहमारे, आत्मा मालिक अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी, पंचायत समितीचे सभापती सौ. पौर्णिमा जगधने, तालुका पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव, शहर पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी, आदिसह लोकप्रतिनिधी व अधिकारी यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी विविध विभागाचे शासकीय अधिकारी, स्वातंत्र्य सैनिकांचे उत्तराधिकारी, शहरातील मान्यवर व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.