संजीवनी अभियांत्रिकीतुन मिळणार बी. टेक ऑनर्स  पदवी- नितिनदादा कोल्हे

संजीवनी अभियांत्रिकीतुन मिळणार बी. टेक ऑनर्स  पदवी- नितिनदादा कोल्हे

Sanjeevani will get from Engineering. B. Tech Honors Degree – Nitindada Kolhe

 उद्योगाभिमुख अभ्यासक्रमांचा अंतर्भाव Inclusion of industry oriented courses

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 28Jan 2021, 19:30

कोपरगांव: संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाला स्वायत्त (ऑटोनॉमस ) शिक्षण  संस्थेचा दर्जा प्राप्त झाल्यामुळे चालु शैक्षणिक वर्षापासून विध्यार्थ्यांना बी. टेक या पदवीबरोबरच अधिकची बी. टेक ऑनर्स ही पदवी देण्याची सुविधा संजीवनीने निर्माण करून दिली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना  उद्योग जगतामध्ये नोकऱ्या  मिळण्यासाठी चांगला फायदा होणार आहे. या संधीचा फायदा घेण्यासाठी चालु शैक्षणिक वर्षात  बाहेरील राज्यातील विद्यार्थ्यांनी सुध्दा येथे प्रवेश  घेतला आहे, अशी  माहिती संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  कार्याध्यक्ष  नितीदादा कोल्हे यांनी सीआयआयच्या (भारतीय उद्योग परिसंघ) प्रतिनिधिंना संजीवनीच्या भेटीमध्ये दिली.
श्री कोल्हे पुढे म्हणाले की, विद्यार्थ्यांना  भविष्यात  नामांकित कंपन्यांमध्ये नोकऱ्या  मिळण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान समावेशक अभ्यासक्रम शिकविणे  व काळानुरूप तो अपडेट करणे हा मुख्य गाभा आहे. उत्कृष्ट  अभ्यासक्रम ठरविण्यासाठी ऊद्योग जगत, शिक्षण , आय.आय.टी. मधिल तज्ञ व्यक्ती व संस्थेचे माजी विद्यार्थ्यांची  समिती तयार करून नव्या अभ्यासक्रमाची रचना करण्यात आली आहे. आय.आय.टी., एन.आय.टी., आय.आय.एम., एच.बी.एस., इत्यादी संस्थांप्रमाणे राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावरील अभ्यासक्रम यापुढे शिकविले  जाणार आहे. उद्योग जगताच्या गरजेनुसार विद्यार्थ्यांमध्ये मध्ये विशेष कौशल्ये  विकसीत केली जाणार आहेत. याचप्रमाणे रोजगार क्षमता वाढीसाठी आणि उद्योजक होण्यासाठी विशेष  प्रशिक्षण  देण्यात येणार आहे.
आता विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी पदवी पुर्ण केल्यावर बी.टेक/बी. टेक ऑनर्स  व पदव्युत्तर पदवी प्राप्त केल्यावर एम.टेक. ही पदवी मिळणार आहे. विशेष  म्हणजे यापुर्वी विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात पर्यावरण जागृती, अर्थशास्त्र, अकौंटन्सी असे विषय  नव्हते. मात्र इंजिनिअर झालेल्या विद्यार्थ्यांना  या विषयांचेही ज्ञान आवश्यक  असते. त्याचप्रमाणे इंग्रजी संभाषण  व लेखन सुधारण्यासाठी इंग्रजी विषयाचाही समावेश  करण्यात आला आहे.
मेकॅनिकल इंजिनिअरींग अंतर्गत रोबोटिक्स, आयओटी इन मेकॅनिकल इंजिनिअरींग, इलेक्ट्रिकल व्हेईकल डीझाईन आणि थ्रीडी प्रिंटिंग , काॅम्प्युटर इंजिनिअरींग अंतर्गत आर्टिफिशियल इंटिलिजन्स, डेटा सायन्स व नेटवर्क अँड  सिक्युरीटी, इन्फर्मेशन टेक्नालाॅजी अंतर्गत सायबर सिक्युरीटी, काॅग्नीटीव्ह इंटिलिजन्स व आयओटी अँड  अनालिसिस, इलेक्ट्रिकल इंजिनिअरींग अंतर्गत इलेक्ट्रिक व्हेईकल, सोलर पावर अँड  पीव्ही टेक्नाॅलाॅजी व रिन्युएबल एनर्जी सोअर्सेस, इलेक्ट्राॅनिक्स अँड  काॅम्प्युटर इंजिनिअरींग अंतर्गत एम्बेडेड सिस्टिीम अँड  आयओटी, रोबोटिक्स अँड  इंडस्ट्रिअल ऑटोमेशन  आणि आर्टिफिशिअल इंटिलिजन्स अँड मशीन  लर्निंग, सिव्हिल स्ट्रक्चरल इंजिनिअरींग अंतर्गत जिओटेक्निकल अँड  फाउंडेशन इंजिनिअरींग, ब्रीज इंजिनिअरींग व मरिन अँड  ऑफशोर  इंजिनिअरींग, मेकॅट्राॅनिक्स इंजिनिअरींग अंतर्गत रोबोटिक्स, इंडस्टी 4.0 व ड्रोन टेक्नाॅलाॅजी आणि सिव्हिल इंजिनिअरींग अंतर्गत  जी आयएस अँड  रिमोट सेन्सिंग, कोस्टल अँड ऑफशोर  इंजिनिअरींग व कन्स्ट्रक्शन  टेक्नाॅलाॅजी हे अधिकचे विषय उत्तिर्ण केल्यास अशा विद्यार्थांना  बी. टेक ऑनर्स ही पदवी बहाल केली जाणार आहे. संजीवनीने ग्रामिण महाराष्ट्रात अशा प्रकारची संधी सर्वात प्रथम निर्माण करून दिली आहे, असे कोल्हे शेवटी म्हणाले .

Leave a Reply

You cannot copy content of this page