कोपरगाव- वैजापूर विनापरवानगी प्रवास; एकावर गुन्हा

कोपरगाव- वैजापूर विनापरवानगी प्रवास; एकावर गुन्हा

कोपरगाव :
प्रशासनाची कोणतेही परवानगी न घेता विनापरवानगी प्रवास करून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

करोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी जिल्हा प्रशासनाकडून जिल्हाबंदी आदेश दिले आहेत. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांच्या या आदेशाचा भंग मनिष बाळासाहेब पवार (३७), रा बोरसर ,ता वैजापुर, जि. औरंगाबाद याने केल्याचे समोर आले आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आरोपी मनिष पवार याने रविवारी (५ जुलै) रोजी बोरसर ,ता वैजापुर, जि. औरंगाबाद येथून दुचाकी क्र. एम एच २० ई क्यु ९५८१ हीवरुन शासकीय परवानगी न घेता कोपरगांव येथे आला होता. आंतरजिल्हा प्रवास के तसेच तोंडाला मास्क न लावता फोन वर बोलत गाडी चालवताना मिळुन आल्याने त्यांनी मा. जिल्हादंडाधिकारी सो.अहमदनगर यांचे आदेशाचे तसेच संचारबंदी आदेशाचे उल्लघंन करुन मानव जिवीताला आरोग्याला किंवा सुरक्षीततेला धोका पोहचेल तसेच त्याचे अशा कृतीमुळे कोणताही संसर्गजन्य आजार पसरवण्याचा संभव असुन ते त्यास माहीत असुनही अशा प्रकारचे हयगयीने वर्तन केले आहे पो.कॉ./८६२ जयदीप दामोदर गवारे ( ३२)
यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन आरोपी मनिष पवार यांच्यावर सदरचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकाॅ. आर. पी. पुंड करीत आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page