गोदावरी कालवे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांची पाणीपट्टी माफ करावी – विवेक कोल्हे

गोदावरी कालवे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांची पाणीपट्टी माफ करावी – विवेक कोल्हे

Farmers in Godavari canal benefit area should be forgiven – Vivek Kolhe

शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ७ नंबर फॉर्म भरून द्यावेत

Farmers should fill up Form No. 7 at most

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 28Feb 2021, 20:00

कोपरगाव:   गेल्यावर्षी पर्जन्यमान चांगले झाले त्यामुळे दारणा गंगापूर धरणे तुडुंब भरले आहे त्या भरोशावर शेतकऱ्यांनी रब्बी उन्हाळी पिकांचे नियोजन केले, पण वीज वितरण कंपनीने ऐन मोसमात रोहित्र बंद केली तर दुसरीकडे जलसंपदा खात्याने आधी थकित पाणीपट्टी भरा मगच पाटपाण्यांचे नियोजनाचे पाहु असा सुर घेतल्याने शेतकरी पेचात सापडला आहे.

गोदावरी कालवे सल्लागार समितीच्या बैठकीचा फार्स करण्यात आला पण रब्बी पाटपाण्याचे नियोजन न जमल्याने शेतकरी त्यात भरडला गेला परिणामी शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले तेव्हा जलसंपदा खात्याने थकीत पाणीपट्टी माफ करावी व शेतकऱ्यांचे 7 नंबर फॉर्म स्वीकारावे अशी मागणी अहमदनगर जिल्हा बँकेचे संचालक विवेक बिपीनदादा कोल्हे यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे विवेक कोल्हे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे नुकसान झाले अशाही परिस्थितीत शेतकरी राजाने कर्ज काढून उन्हाळ व रब्बी पिकांचे नियोजन केले मात्र पिके ऐन मोसमात असताना महाविकास आघाडी शासनाने त्यांच्यावर वीज बिलाचा वरवंटा फिरवत अचानक रोहित्र बंद करून रब्बी पिकांचे कोट्यवधीचे नुकसान केले आहे. वीज रोहित्र बंद असल्यामुळे शेतकऱ्यांना विहीरीत पाणी असूनही ते पिकांना देता आले नाही ज्यांची वीज चालू आहे त्यांना केवळ चार तास ती मिळते परिणामी त्यांची ही नुकसान होते मुख्य अभियंता व नाशिक पाटबंधारे विभागाने थकित पाणीपट्टी भरल्याशिवाय शेतकऱ्यांचे नमुना नंबर ७ आणि अर्ज स्वीकारणार नाही हे धोरण अशा परिस्थितीत न राबविताशेतकऱ्यांना दिलासा द्यावा. गोदावरी कालव्यांना उन्हाळा पाटपाण्याचे आवर्तने किती द्यायचे याची ही घोळ अद्याप मिटला नाही त्यामुळे शेतकरी वर्गात संभ्रम आहे तेव्हा जलसंपदा विभागाने शेतकऱ्यांची थकित पाणीपट्टी वसुलीसाठी तगादा न लावता यांच्याकडून रीतसर ७ नंबर फॉर्म भरून घ्यावेत व शेतकऱ्यांनी देखील जास्तीत जास्त पाणी मागणी नोंदवून ७ नंबर फॉर्म भरून द्यावेत असे आवाहनही विवेक कोल्हे यांनी शेवटी केले आहे

Leave a Reply

You cannot copy content of this page