अपयशाचे खापर वहाडणेच्या डोक्यावर फोडण्यासाठी विरोधकांचा रडीचा डाव

अपयशाचे खापर वहाडणेच्या डोक्यावर फोडण्यासाठी विरोधकांचा रडीचा डाव

Opponents’ radish innings hit Khapar of failure Vahadane on the head

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 2Feb 2021, 18:00

कोपरगाव : गेल्या चार वर्षापासून शहरात विकासकामे व्हावीत म्हणून नगराध्यक्ष व सर्व सहकारी नगरसेवक प्रयत्नशील आहेत, मात्र शहरात विकास कामे होऊ नयेत, अपयशाचे खापर वहाडणेच्या डोक्यावर फोडण्यासाठी काही विरोधक हा रडीचा डाव खेळत असल्याचा आरोप नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.

 

वहाडणे म्हणाले, २८ कामांपैकी १२ च कामे का घेतली ? असा प्रश्न उपस्थित करून १२ जानेवारी च्या स्थायी समितीत विषय नामंजूर केले, पुढच्या मिटींगला सर्व कामे घ्या आम्ही मंजूर करू असे त्यांनी म्हटले होते तशी मीटिंग बुकातही नोंद आहे कालच्या १ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत २८ विषय घेतले असता सर्व कामांचे री इस्टिमेट करा, बांधकाम संबंधित विषय असल्याने प्राधिकरणा ऐवजी बांधकाम खात्याकडून तांत्रिक मंजुरी का घेतल्या नाहीत ? या नावाखाली पुन्हा एकदा शहरातील रस्त्यांच्या कामाचे प्रस्ताव स्थायी समितीने फेटाळून लावले आहेत. या मुद्यावरून पुन्हा एकदा नगराध्यक्ष विरुद्ध सेना-भाजप असे चित्र कोपरगाव नगरपालिकेत निर्माण झाले आहे. प्राधिकरण ही सरकारने नेमलेली समिती आहे यापूर्वीही मी येण्याआधी प्राधिकरण विभागाकडून शेकडो तांत्रिक मंजुरी यांच्या लोकांनी घेतलेले आहेत, तेंव्हा कशा चालल्या, प्रस्तावित रस्त्यांच्या कामाचे इस्टिमेट जादा रकमेचे असल्याचा आरोप होत आहे ? यावर वहाडणे म्हणाले, कोणत्याही कामाचे बिल एमबी रेकॉर्ड प्रमाणेच मिळते त्यामुळे जितके काम होईल तितके पैसे दिले जाणार आहेत. तीनशे रुपये रोजाने इंजिनियर च्या हाताखाली काम करणार्‍या माणसाला ४० लाख रुपये सुपरव्हिजन फी दिली आहे काय ? यावर वहाडणे म्हणाले, कामाचे रकमेत जीएसटी, विमा खर्च, अचानक उद्भवणारे खर्च या सर्वांचा समावेश असतो, सुपरव्हिजन दोन टक्के ऐवजी १.८४% देऊन आम्ही बचत केली आहे , उलट मी तर पैसे वाचविले आहेत. चुकीचे असल्याचे सांगून अधिकाऱ्यांना हतबल करण्याचा डाव आहे. शहरात जिकडेतिकडे पेव्हर ब्लॉक बसविण्यात आले याअर्थकारणाची मोठी चर्चा आहे ?. यावर वहाडणे म्हणाले पेव्हर ब्लॉक हे नगरसेवकांच्या लेखी मागणी वरून बसविले, काम सुचवा दहा टक्के घ्या ? या नव्या फार्मुल्याची सध्या जोरदार चर्चा आहे ? यावर वहाडणे म्हणाले, ९५ टक्के ठेकेदार हे सत्ताधाऱ्यांच्या जवळचे आहेत, आपल्या नेत्यांसमोर बैठकीत गोंधळ घालणारे काही नगरसेवक ठेकेदाराला फोन करून विचारतात आमची भेट का घेतली नाही ? आंबेडकर मैदान येथील कॉंक्रिटीकरण आत वहाडणे यांचा माणूस पार्टनर असल्याची चर्चा आहे ? ठेकेदार पोट ठेकेदार कोण आहे ? याची तपासणी तुम्ही करा असे उत्तर वहाडणे यांनी दिले, तसेच २०१७ चे काम ठेकेदार त्या पैशात आज कसे करतो? त्यावर वहाडणे म्हणाले, त्याला मार्जिन कमी मिळेल, मला बदनाम करण्यासाठी शहरात पत्रके वाटली गेली मी सुद्धा लवकरच आईवडिलांची शपथ घेऊन पत्रके वाटणार आहे असेही वहाडणे यांनी सांगितले. मला कोणाचा अवमान करावयाचा नाही परंतु आजपर्यंत झालेल्या सर्व नगराध्यक्ष मध्ये सर्वात जास्त कामे प्रत्येक प्रभागात कोणताही भेदभाव न करता मी केली व अजूनही करायची आहेत असा दावा विजय वहाडणे यांनी केला शहरातील मोक्याचे रस्ते झाले तर वहाडणे विरुद्ध नगरपालिका निवडणुकीत बोलायचे काय ? या भीती पोटीच विरोध होत असल्याचा आरोपही वहाडणे यांनी केला.शहरात विकास न झाल्यास आम्हाला सत्ता मिळेल हा डाव विरोधकांचा आहे.

कोपरगाव शहराला पाणीप्रश्न कायम भेडसावत असताना साठवण तलावाचे काय झाले ? यावर बोलताना वहाडणे म्हणाले, लवकरच निधी मिळून सिमेंट कॉंक्रिटीकरण असलेला साठवण तलाव होणार आहे,

यावर शहराला पाणी पाहिजे ते कुठून आणि कसे येते हा प्रश्न महत्वाचा नाही, असे असताना निळवंडे चे पाणी विनासायास कुठलीही आर्थिक तोशीश न लागता दारापर्यंत येऊन ठेपले होते, ते तर अगदी सोपे झाले होते ? , मग ते पाणी येत असताना आपण विरोध का केला ? यावर वहाडणे म्हणाले, माझा विरोध नव्हताच, मग आपण न्यायालयात बाजू मांडण्यासाठी नगर पालिकेने वकील का दिला नाही ? यावर मात्र त्यांनी विषयाला बगल दिली व नांदूर मधमेश्वर ते कोपरगाव बंदिस्त पाइपलाइनचा प्रस्ताव तयार असल्याची बतावणी वहाडणे यांनी केली.  कन्सल्टन्सी फी या नावाखाली माझी बदनामी करण्यासाठी विरोधकांनी शहरभर खोटी पत्रके वाटली, परंतु मी माझ्या आई वडिलांची शपथ घेऊन खरी पत्रके वाटणार असल्याचे वहाडणे यांनी शेवटी जाहीर केले.

Leave a Reply

You cannot copy content of this page