क्रीडा क्षेत्रात आमदारांनी राजकारण आणु नये – सुमित कोल्हे

क्रीडा क्षेत्रात आमदारांनी राजकारण आणु नये – सुमित कोल्हे

MLAs should not bring politics in sports – Sumit Kolhe

खेळाडूंच्या भवितव्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे Everyone should come together for the future of the players

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 3Feb 2021, 18:00

कोपरगाव : माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांनी २००३-०४ साली कोपरगावसाठी तालुका क्रीडा संकुल मंजूर करून केले व स्वतःच्या संस्थेची सहा एकर जागा क्रीडा संकुलासाठी विनामूल्य उपलब्ध करून दिली. मात्र याची जाणिव न ठेवता विद्यमान आमदार हे क्रीडा क्षेत्रात राजकारण आणु पाहत असल्याचा आरोप संजीवनी फाऊंडेशनचे सचिव व युवा नेते सुमित कोल्हे यांनी एका स्पर्धेच्या बक्षीस वितरण प्रसंगी आमदार आशुतोष काळे यांनी शहरालगत उपसंकुल उभारण्याच्या प्रयत्नात आहोत.या वक्तव्याचा समाचार घेताना केला. याउलट खेळाडूंच्या भवितव्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे असे आवाहन त्यांनी केले .

सुमित कोल्हे म्हणाले की सर्वांनीच मागील पाठपुराव्याची व सत्य परीस्थितीची माहिती घेणे गरजेचे आहे. ज्या जागा भविष्यातील उपसंकुलासाठी आमदार सांगत आहे, त्या जागा तांत्रिक अडचणी व पुरेशा नसल्यानेच व शहरालगत कोणी जागा देण्यास तयार नसल्या कारणाने माजी मंत्री  शंकरराव कोल्हे यांनी स्वतःच्या अधिपत्याखालील संजीवनी कृषी , शैक्षणिक व ग्रामिण विकास संस्था या संस्थेची ३ एकर ३६ गुंठे जागा उपलब्ध करून दिली. मात्र या जागेत ४०० मीटरचा रनिंग ट्रॅक व्यवस्थित बसत नसल्याने संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्थेने २ एकर क्षेत्र क्रीडा संकुलासाठी दिले. अशी एकुण सुमारे ६ एकर जागा दिली. एवढेच नव्हे तर शासनाने दिलेल्या रू २५ लाख निधित अपेक्षित क्रीडा संकुलाचे काम पुर्ण होत नाही असे लक्षात येताच संजीवनी ग्रामिण शिक्षण संस्थेच्या वतीने रू १४ लाखांचा अधिकचा निधी देवुन क्रीडा संकुलाचे काम पुर्ण केले. आजही शंकरराव कोल्हे तेथील उपक्रमांची नियमीत माहिती घेवुन तेथिल समस्यांचे निराकरण करतात. विद्यमान आमदार अनेकदा उपसंकुल उभारण्याची भाषा करतात. खरे तर आपल्या तालुक्यात प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये उपसंकुल निर्माण झाले तरी हरकत नाही, आपल्या सर्व खेळाडूंना पुढे जाण्यास मदतच होईल. मात्र येणारा निधी इतरत्र उपसंकुलाच्या नावाखाली पळविण्यापेक्षा त्यातुन सध्याच्या तालुका क्रीडा संकुलात प्रेक्षकांसाठी अद्ययावत आसन व्यवस्था व आधुनिक क्रीडा साधने उपलब्ध करून देणे संयुक्तीक व उपयुक्त ठरेल. त्यासाठी आमच्या स्थरावर क्रीडा प्रेमींना बरोबर घेवुन आम्ही षासन दरबारी पाठपुरावा करीतच आहोत. आपल्या तालुक्यातील सर्वच खेळाडू व त्यांच्या उज्वल भवितव्यासाठी आम्ही निश्चितच सर्व क्रीडा प्रेमींसोबत आहोत. त्यामुळे इतर कोणी जिव्हाळा दाखविण्याच्या नावाखाली क्रीडा क्षेत्रात राजकारण आणु नये. सध्या कोपरगांव शहर व परीसरातील शेकडो खेळाडू रोज सकाळी व संध्याकाळी तालुका क्रीडा संकुलात येवुन खेळाचा व व्यायामाचा आनंद घेत असतात. ज्यांना याबाबत शंका असेल त्यांनी सकाळी लवकर झोपेतुन उठून क्रीडा संकुलात आल्यास त्यांच्या क्रीडा संकुल गैरसोयीचे असल्याच्या शंकेचे निरसन होईल, तरी इतरही काही शंका असल्यास आपण सांगाल त्या व्यासपीठावर कागदपत्रांच्या पुराव्यांसहित शंकांचे निरसन करण्यास आम्ही समर्थ आहोत, असे श्री कोल्हे यांनी पत्रकात शेवटी म्हटले आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page