शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीवर भर द्यावा – आ. आशुतोष काळे

शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीवर भर द्यावा – आ. आशुतोष काळे

Teachers should focus on enhancing the quality of students – MLA Ashutosh Kale

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 5 Feb 2021, 18:30

कोपरगाव : केवळ मार्कांच्या फुगलेल्या आकडेवारीवरून गुणवत्ता सिद्ध होत नाही.  तेंव्हा शिक्षकांनी शाळेच्या १०० टक्के निकालावर भर न देता स्कॉलरशिप, प्रज्ञा शोध परीक्षांच्या माध्यमातून विद्यार्थी चमकले पाहिजेत. विद्यार्थी सर्वच विषयात अव्वल कसा राहील यासाठी विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीवर भर द्यावा असे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केले.

पोहेगाव येथील ग.र.औताडे पाटील  विद्यालयात जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत जि प सदस्या सौ. सोनाली रोहमारे यांच्या निधीतून चांदेकसारे गटातील गरजु विद्यार्थी- विद्यार्थिनींना सायकल वाटप तसेच स्व. ग.र. औताडे पाटील पुतळा परिसर सुशोभीकरण व संरक्षक भिंतीच्या कामाचे भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते.

 आ.  काळे  म्हणाले , प्रत्येक विद्यार्थ्याने आपले  उद्दिष्ट्य साध्य करण्याचा विचार करावा. शैक्षणिक विकास साधतांना ज्ञानासाठी   आधुनिक तंत्रज्ञानाबरोबरच पुस्तक वाचनावर भर देवून अभ्यासाचे व खेळाचे वेळापत्रक तयार करून प्रगतीची शिखरे गाठावी असा मौलिक सल्ला  विद्यार्थ्यांना दिला.

यावेळी सौ. पौर्णिमा जगधने,  अर्जुन काळे,  सुधाकर रोहोम,  सुनील शिंदे, सचिन रोहमारे, काकासाहेब जावळे, आनंदराव चव्हाण, जि प. सदस्या सौ. सोनाली रोहमारे,  सौ. अनुसया होन, रोहिदास होन, संदीप रोहमारे, राहुल रोहमारे, एम.टी. रोहमारे, दिलीप औताडे, बाबुराव थोरात,  किसनराव पाडेकर, वाल्मिक नवले, नंदकिशोर औताडे, संजय रोहमारे, राहुल जगधने, सचिन मुजगुले, गोपीनाथ रहाणे, जयंत रोहमारे, देवेन रोहमारे, मधुकर औताडे, भाऊसाहेब सोनवणे, एकनाथ औताडे, नरहरी रोहमारे, गवळी सर, बांगर सर, राजेंद्र औताडे, शिक्षक, विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

You cannot copy content of this page