कोपरगावात सर्वत्र गुरुपौर्णिमा उत्सव यंदा साध्या पद्धतीने;
गुरूचे ऑनलाइन दर्शन घेऊन घरात राहून गुरुपौर्णिमा उत्सवात साजरी केली.
कोपरगाव :
करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा गुरुपौर्णिमा उत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला आहे. या दरम्यान कोणतेही धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम होणार झाले नाही.
सध्या देशभरात तसेच राज्यात कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर कहर सुरूच असून त्यामुळे अनेक देवस्थान देवालय बंद आहेत त्यामुळे यावर्षीचा गुरु पौर्णिमेचा उत्सव कोपरगाव तालुक्यात अति अतिशय साधेपणाने साजरा करण्यात आला. घरात देव्हाऱ्यासमोर बसून गुरुची पाद्यपूजा केली. मंदिर परिसरात येण्यास भाविकांना बंदी घालण्यात आल्याने सर्वत्र शुकशुकाट होता देवा काहीही कर मात्र या जीवघेण्या कोरोनाला कायमचे घालव अशी प्रार्थना यावेळी अनेकांनी करत देवाला साकडे घातले. वरूण राजाने मात्र दिवसातून दोन ते तीन वेळेस हजेरी लावली होती. तालुक्यात कोकमठाण येथील जंगली महाराज आश्रम ट्रस्ट

बेट भागातील राष्ट्र संत जनार्दन स्वामी महाराज समाधी मंदिर शहरातील साईबाबा तपोभूमी मंदिरात कोकमठाण येथील रामदासी महाराज मंदिर बेट भागातील गुरु शुक्राचार्य कचेश्वर मंदिरात संवत्सर येथील शृंगऋषी मंदिरात विभांडक ऋषी आश्रमात मंजूर येथील शिवानंद गिरी महाराजांच्या आश्रमात धामोरी येथील गोरक्षनाथ मंदिरात शहरातील दत्त पारावर असलेल्या दत्त मंदिरात व विविध मंदिरातून गुरु पौर्णिमेचा उत्सव अतिशय साध्या पद्धतीने मोजक्याच महाराज नागरिक विश्वस्त आदींच्या उपस्थित साजरा केला गेला बेट भागातील राष्ट्रसंत मौनगिरी जनार्दन स्वामी महाराज आश्रमात संत रमेश गिरी महाराज यांच्या हस्ते पाद्यपूजा करून स्वामींना राज्यावर आलेल्या कोरोना चे संकट दूर होवो अशी प्रार्थना करण्यात आली. कोकमठाण येथील जंगली महाराज आश्रमात गुरुमाऊलींच्या उपस्थितीत आश्रमाच्या आत मध्ये असलेल्या भाविकांनी गुरुपौर्णिमा सोशल डिस्टंसिंग पाळुन साजरी केली कोरोना महामारी मुळे अनेक भाविकांनी घरात बसूनच देवदेवतांच्या फोटोचे पूजन करीत गुरूंचे नामस्मरण करत गुरूंचे दर्शन घेतले गेले. चार महिने लॉक डाउन असल्याने अनेकांचे धंदे पाणी बसले गेल्याने तोंडचे पाणी पळाले आहे. पुरणाचे संकट कधी दूर होणार या चिंतेत भाविकांसह नागरिक महिला आहेत मंदिरे बंद असल्याने महाप्रसादाला ही यावेळेस अनेक भाविक मुकले गेले कोपरगाव ग्रामीण व शहर पोलिसांनी सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवला होता चौकट
अनेकांनी आपल्या गुरूचे ऑनलाइन दर्शन घेऊन घरात राहून गुरुपौर्णिमा उत्सवात साजरी केली. सध्या सोशल मीडियाचा मोठा बोलबाला असल्याने त्यावर अनेक देव-देवतांची फोटो गुरु व गुरुपौर्णिमा उत्सवाबद्दल आदर व्यक्त करणारे मेसेज मोठ्याप्रमाणावर फिरत होते त्या माध्यमातून अनेकांनी एकमेकांना शुभेच्छा व्यक्त केल्या .





