गुरुमाऊलीने तमाशा थांबवुन कर्जाचा व्याजदर कमी करावा-ज्ञानेश्वर माळवे
कोपरगाव
स्वतःच्या घरात तमाशा ऊभा करायचा, सभासदांची दिशाभुल करायची व कर्जव्याजदराच्या माध्यमातुन सभासदांचे शोषण करायचे. हा किळसवाणा प्रकार गेल्या पाच वर्षापासुन प्राथमिक शिक्षक बँकेत चालु आहे.सदरचे शोषण थांबवुन कर्जाचा व्याजदर नऊ टक्के करा. अशी मागणी सदिच्छा मंडळाचे जिल्हा कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर माळवे यांनी केली आहे.
सन 2016 मध्ये शिक्षक बँकेत “गुरुमाऊली” मंडळाची सत्ता आली.दि. 22/02/2016 रोजी ₹500/- च्या स्टँपवर नोटरी करत कर्जाचा व्याजदर कमी ठेवु,संचालक मिटींगा वर्षात 14 च होतील व संचालक प्रवासभत्ता घेणार नाही असे जाहीर वचन गुरुमाऊली मंडळाने लिहुन दिले होते. सत्ता आल्यानंतर सर्व वचनांना हरताळ फासण्यात आला.संपुर्ण भारतामध्ये राष्ट्रियीकृत बँका,नागरी सहकारी बँका,नोकरदारांच्या बँका यांचे कर्जाचे व्याजदर कमालीचे घसरले आहेत.मात्र नगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेची वसुली 100% असतांना,बँकेवर दुसर्या कोणत्याही बँकेचे कर्ज नाही, बँक स्वभांडवली असतांना सभासदांचे कर्जाच्या व्याजदरातुन प्रचंड शोषण चालवले आहे. सन2016मध्ये 11%,सन 2017 मध्ये 11व 13% सन 2018 मध्ये 10.75% सन 2019 मध्ये 10.50% व सन2020 मध्ये 10.30%टक्के प्रमाणे वसुली करण्यात आली. कर्जाच्या व्याजदराच्या माध्यमातुन पठाणी वसुली करायची व नफा जादा झाल्याचा डांगोरा पिटवायचा.मात्र जादा नफ्याचा सभासदांना फायदा न देता, कर्माचार्याचे वेतन भत्ते,विविध खरेदी ,शताब्दी वर्ष,घड्याळ खरेदी,नेवासा व इतर शाखा दुरुस्त्या,फर्निचर ,प्रवास भत्ते या वा इतर अनेक माध्यमातुन संचालकांनी स्वतःचे खिसे भरायचे हाच कार्यक्रम गेल्या पाच वर्षापासुन सातत्याने चालु आहे.
सभासदांचे लक्ष या सर्वांपासुन विचलीत करण्यासाठी “गुरुमाऊली” मंडळातच मोठा तमाशा वारंवार उभा केला गेला,दोन गट केले,कधी कुणाचा प्रवेश तर कुणाची हकालपट्टी यात सभासदांना गुंतवुन बँकेवर राजरोज पांढरा दरोडा टाकण्याचे पाप गुरु माऊली मंडळाने केले आहे! कर्जाचा व्याजदर नऊ टक्के करा.व सभासदांचे शोषण थांबवा अशी विनंती सर्वश्री माळवेंसह,गहिनीनाथ शिरसाठ, बाळकृष्ण डमाळ,राजाभाऊ बेहेळे,चंदु मोढवे,राजेंद्र बनकर,अशोक गव्हाणे, सुनिल सोळसे,संतोष भोंडवे,अशोक गडाख,अशोक पथवे,शंकर गाडेकर, गहीनिनाथ पिंपळे आदींनी केली आहे. गुरुमाऊलीने घरातील संघर्ष घरातच मिटवुन सभासदांचे शोषण थांबवा.
जिल्ह्यातील सभासद सुज्ञ असुन येत्या निवडणुकीत गुरुमाऊलीच्या दोन्ही गटांना घरचा रस्ता दाखवतील असा इशारा राजेंद्र शिंदे व रविंद्र पिंपळे यांनी दिला आहे.