अरेरावी केल्याने कोपरगाव नगरपालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

अरेरावी केल्याने कोपरगाव नगरपालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

Kopargaon Municipal Officers and Employees Shut Down

कोपरगाव : नगरसेवक विजय वाजे यांनी १० फेब्रुवारी रोजी सकाळी साडे बारा वाजे दरम्यान येथील नगरपालिका कार्यालयामध्ये येऊन अधिका-याला तू टेबलावरून उठ अशी अरेरावीची भाषा केल्याने नगरपालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तात्काळ काम बंद आंदोलन सुरू केले आहे.

याबाबत नगर पालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पत्रक जारी केले असून या पुस्तकामध्ये नगरसेवक विजय वाजे यांनी अधिकाऱ्याला तू टेबलावरून उठ, टेबल येथेच राहिल, मी ३५३ घाबरत नाही, मी मुंबईच्या एका अधिकाऱ्याला मारले आहे अशी धमकी दिली. नगरसेवक कर्मचाऱ्यांना दमदाटी करून लवकरात लवकर काम करण्यास भाग पाडतात तसेच महिला अधिकाऱ्यांना सुद्धा हिनतेची व अपमानास्पद वागणूक दिली जाते. यामुळे आम्ही सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी हा पवित्रा घेतल्याचे सांगून याबाबत जोपर्यंत सन्माननीय नगरसेवकावर कारवाई होणार नाही, तोपर्यंत नगरपालिका येथील कर्मचारी काम करणार नाही असा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला असून या कालावधीत प्रलंबित राहिलेल्या कामाची जबाबदारी सन्मानीय नगरसेवकावर राहील असा इशाराही पत्रकातून शेवटी देण्यात आला आहे. सदरचे पत्रक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, नगर विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, खासदार सदाशिव लोखंडे, आमदार आशुतोष काळे, आयुक्त नाशिक जिल्हाधिकारी नगर, उपनगराध्यक्ष यांना पाठविण्यात आले आहे. या पत्रकावर अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सह्या आहेत.

Leave a Reply

You cannot copy content of this page