कु.ईश्वरी महाजन हिस IMO परिक्षेत आंतराष्ट्रीय सुवर्णपदक
Ms. Ishwari Mahajan International Gold Medal in His IMO Exam
समता इंटरनॅशनल स्कूलच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा, Samata International School’s crowning glory,
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 11Feb 2021, 13:00
कोपरगांव- चालू वर्षी शैक्षणिक क्षेत्रात एक प्रकारची मंदी अनुभवली गेली असली तरीही समताच्या विद्यार्थ्यांनी मात्र गगन भरारी घेण्याचा ध्यास सोडला नाही. समता इंटरनॅशनल स्कूलची विद्यार्थीनी कु.ईश्वरी अनघा संजय महाजन इयत्ता ३ री हिने इंटरनॅशनल मॅथ ऑलिम्पियाड (IMO) मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकाविले व शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे .
दरवर्षी समता इंटरनॅशनल स्कूलचे विद्यार्थी सायन्स ऑलिम्पियाड फाउंडेशन द्वारा आयोजित वेगवेगळ्या स्पर्धा परिक्षेत सहभाग नोंदवितात व यशश्री खेचून आणतात. शैक्षणिक वर्ष २०१९- २० मध्ये आयोजित केलेल्या इंटरनॅशनल मॅथ ऑलिम्पियाड परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. या निकालात ईश्वरीच्या या दैदिप्यमान यशामुळे अनेक विद्यार्थ्यांसमोर एक आदर्श निर्माण झाला आहे. तिच्या या अद्वितीय यशाबद्दल समता इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे, मॅनेजिंग ट्रस्टी सौ.स्वाती संदीप कोयटे, शैक्षणिक संचालिका सौ.लिसा बर्धन, उपप्राचार्य श्री.विलास भागडे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.





