ग्रामीण भागांच्या रस्त्यांसाठी निधीची ना. अजित पवारांकडे आ. काळेंची मागणी
funds for rural roads. Come to Na. Ajit Pawar. MLA Kale demand
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 11Feb 2021, 13:10
कोपरगाव : विधानसभा मतदार संघातील ग्रामीण भागात रस्ते विकासाचा अनुशेष खूप मोठा आहे. त्यासाठी लेखाशीर्ष ३०५४ अंतर्गत रस्ते दुरुस्तीसाठी जास्तीत जास्त निधी द्या अशी मागणी आमदार आशुतोष काळे यांनी उपमुख्यमंत्री तथा अर्थ व नियोजन मंत्री ना. अजितदादा पवार यांच्याकडे बुधवारी (१०) नाशिक येथील आयुक्त कार्यालयातील नियोजन बैठकीत केली.
यावेळी ग्रामविकास मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.हसन मुश्रीफ, उर्जा राज्यमंत्री ना.प्राजक्त तनपुरे, जिल्हापरिषदेच्या अध्यक्षा ना.राजश्री घुले, आमदार आशुतोष काळे, संग्राम जगताप, डॉ. किरण लहामटे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रताप शेळके, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव देवशिष चक्रवर्ती, उपसचिव व्ही.एफ.वसावे, जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले, जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश शिंदे, जिल्हा नियोजन अधिकारी निलेश भदाणे यांच्यासह विविध कार्यान्वयीन यंत्रणांचे प्रमुख यावेळी उपस्थित होते. या बैठकीत वाढीव प्रारूप आराखड्यास मंजुरी देण्यात आली. यावेळी आ. आशुतोष काळे यांनी ना. अजित पवार यांचे कोपरगाव मतदार संघा मतदार संघातील कामाकडे लक्ष वेधताना प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी तसेच क वर्ग तिर्थक्षेत्रातील देवस्थानासाठी निधी मिळावा. कोपरगांव येथील वळूमाता प्रक्षेत्राच्या मालकीच्या ९५ एकर क्षेत्रास तटरक्षक भिंत बांधणे व ऑफिस, शेडची सुधारणा करण्यासाठी व पशु वैदयकीय दवाखाना कर्मचारी निवासस्थानासाठी तसेच उजनी प्रकल्पासाठी स्वतंत्र फिडर करिता ३ किमी अंतराची वीज वाहिनी देणेसाठी निधी मिळावा या मागण्या केल्या आहेत. आ. काळे यांच्या या सर्व मागण्यांची दखल घेऊन नामदार अजित पवार यांनी मागण्यांना हिरवा कंदील दाखविला आहे.





