कोपरगाव पालिकेच्या फायर स्टेशनला पंडीत दिनदयाळ उपाध्यायांचे नाव; आमच्यासाठी भाग्याचा क्षण – सौ स्नेहलता कोल्हे

कोपरगाव पालिकेच्या फायर स्टेशनला पंडीत दिनदयाळ उपाध्यायांचे नाव; आमच्यासाठी भाग्याचा क्षण – सौ स्नेहलता कोल्हे

Name of Pandit Dindayal Upadhyay to Kopargaon Municipal Fire Station A moment of fortune for us – Mrs. Snehalta Kolhe

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 11Feb 2021, 15:10

कोपरगाव –  शहरामध्ये विकास कामांचा डोंगर उभा करतांना शहरवासियांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अद्यावत सोयीसुविधायुक्त फायर स्टेशन उभारण्यास प्राधान्य दिले, या  फायर स्टेशन इमारतीला  पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे नाव त्यांच्या  पुण्यतिथीचे औचित्य साधून  देण्यात आले हा क्षण आमच्यासाठी भाग्याचा असल्याचे भावोद्गार भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी व्यक्त केले .

कोपरगाव शहरात आज पर्यंत घडलेल्या संकटसमयी संजीवनी उद्योगसमूहाची अग्निशमन सेवा संकट मोचन बनवून कायम धावून आली आहे. परंतु वाढत्या शहरात दुर्दैवाने एखादी घटना घडली तर त्या संकटाचा सामना करण्यासाठी पालिकेची स्वतःची अद्यावत अग्निशमन सेवा व फायर  स्टेशन असावे या भूमिकेतूनच सातत्याने पाठपुरावा केल्यानेच  आज ही सुमारे ७४ लाख रूपयांची शहराच्या वैभवात भर घालणारी अद्ययावत फायर स्टेशन इमारत उभी राहिली आहे. पंडीत दिनदयाळ उपाध्याय यांचे नाव दयावे म्हणून भारतीय जनता पार्टी आग्रही राहिली, त्यासाठी नगरसेवकांनी एकमुखी मागणी केली.याचा मला सार्थ अभिमान वाटतो, त्या फायर स्टेशन इमारतीला आजच्या दिनी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे नाव देऊन दुग्धशर्करा योग म्हणून हा माझ्यासाठी भाग्याचा क्षण आहे. असे सौ. कोल्हे म्हणाल्या.

Leave a Reply

You cannot copy content of this page