गटनेत्यांच्या दिलगिरीनंतर कोपरगाव नगरपालिका अधिकारी कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन मागे
After the apology of the group leaders, the Kopargaon municipal officials stopped the work of the employees
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 11Feb 2021, 16:10
कोपरगाव : नगरसेवक विजय वाजे यांनी पालिका अधिकाऱ्यांना अरेरावीची भाषा केल्याप्रकरणी कोपरगाव नगरपालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले होते मात्र गटनेते रवींद्र पाठक व उपनगराध्यक्ष स्वप्निल निखाडे यांनी गुरुवारी दिलगिरी व्यक्त केल्यानंतर पालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेतले.
नगरसेवक विजय वाजे यांनी बुधवारी १० फेब्रुवारी रोजी सकाळी साडे बारा वाजे दरम्यान येथील नगरपालिका कार्यालयामध्ये येऊन अधिका-याला तू टेबलावरून उठ अशी अरेरावीची भाषा केल्याने नगरपालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तात्काळ काम बंद आंदोलन सुरू केले आहे. हो या प्रकरणाचे जोरदार पडसाद शहरात उमटले याने गुरुवारी कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन सुरू असताना भारतीय जनता पार्टीचे गटनेते रवींद्र पाठक व उपनगराध्यक्ष स्वप्निल निखाडे यांनी नगरसेवक विजय वाजे यांच्या वतीने झाल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केले त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले असल्याची माहिती कर्मचारी वर्गाकडून देण्यात आली.





