छोटूभाई जोबनपुत्रा यांचे निधन
Chhotubhai Jobanputra passed away
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 11Feb 2021, 16:20
कोपरगाव : येथील कोपरगाव ज्येष्ठ नागरिक मंचाचे अध्यक्ष व सहकारमहर्षी कोल्हे कारखान्याचे माजी गुणवंत कामगार छोटूभाई तुळसिदासजी जोबनपुत्रा (८२) यांचे निधन झाले.
त्यांच्या मागे दोन मुले, सुना नातवंडे असा परिवार आहे. मयूर इलेक्ट्रिकल्सचे मालक योगेश, निलेश जोबन पुत्र i ते यांचे ते वडील होत. छोटूभाई यांनी गुजरात येथील जन्मभूमी या वृत्तपत्रासाठी कोपरगाव येथून वार्ताहर म्हणून काम केले होते. ज्येष्ठ नागरिकांसाठी असणाऱ्या विविध शासकीय निमशासकीय योजनांचा लाभ थेट त्यांच्यापर्यंत मिळवून देण्यात त्यांनी शर्थीचे प्रयत्न केले, तसेच त्यांच्यासाठी विविध आरोग्य शिबिरे देखील आयोजित केली. प्रत्येक कार्यात ते नेहमीच पुढाकार घेत असत. थोरामोठ्यांचे वाढदिवस लक्षात ठेवून त्यांना प्रत्येक वाढदिवस दिनी शुभेच्छा देण्यात त्यांचा हातखंडा होता. कोपरगाव शहरात 1959 साली मोठा दुष्काळ पडला होता, नैसर्गिक संकट दूर व्हावे यासाठी त्यांचे वडील तुळशीदास व बंधू बाबुलालजी यांनी सराफ बाजार येथील महादेव मंदिरात 21 दिवस उपवास केला होता, त्यावेळी निसर्गाला देखील त्यांच्या या उपोषणाची दखल घेऊन पाऊस पाडावा लागला होता. या उपोषणाची राज्यभर चर्चा झाली होती. छोटूभाई यांनी स्थानिक रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य म्हणूनही काम पाहिले होते त्यांच्या निधनाबद्दल खासदार सदाशिव लोखंडे, माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे, माजी मंत्री शंकरराव कोल्हे, आमदार आशुतोष काळे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे, राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे नगराध्यक्ष विजय वहाडणे, उद्योगपती कैलास ठोळे गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे माजी नगराध्यक्ष संजय सातभाई, ज्येष्ठ नागरिक मंचाचे विजय बंब ज्येष्ठ पत्रकार सी बी गंगवाल सुरेश रासकर आदींनी शोक व्यक्त केला.