रोप स्किपींग स्पर्धेत संत जनार्दन स्वामी महाराज महर्षी स्कूलचे यश
Success of Sant Janardan Swami Maharaj Maharshi School in Rope Skipping Competition
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 11Feb 2021, 16:30
कोपरगाव :संत जनार्दन स्वामी महाराज महर्षी स्कूल च्या खेळाडुंनी १९ वयोगटात सहभाग घेतला होता. यात वैयक्तिक प्रकारात श्लोक अतुल कोताडे याने सिंगल बाउंन्स या प्रकारात व्दितीय क्रंमाक मिळविला. तर ओम उमेश गोसावी याने स्पिड इण्डयुरन्स या प्रकारात व्दितीय क्रंमाक मिळविला, तसेच साई महेश गोसावी याने स्पिड स्प्रिन्ट या प्रकारात चतुर्थ क्रंमाक मिळविला. सर्व विजेत्या खेळाडुंना पदके व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
सहोदया संगम सीबीएसई स्कूलच्या आंतर षालेय रोप स्किपींग स्पर्धा नुकत्याच ध्रुव ग्लोबल स्कूल, संगमनेर येथे संपन्न झाल्या. या स्पर्धेत एकुण १७ सीबीएसई शाळेतील खेळाडुंनी सहभाग घेतला होता.
या सर्व यशस्वी खेळाडुंचे विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष मोहनराव चव्हाण, विश्वस्त बाळासाहेब चव्हाण, सर्व विश्वस्त प्राचार्य राजेंद्र पानसरे, पर्यवेक्षिका सौ. जे.के. दरेकर व सर्व शिक्षक वृदांनी अभिनंदन केले. या सर्व यशस्वी खेळाडुंना क्रीडा शिक्षक शिवप्रसाद घोडके, गणेश वाकचौरे,योगेश बिडवे, प्रिया बोधक यांचे मार्गदर्शन लाभले.