जिल्हा बँकेवर आ. आशुतोष काळे बिनविरोध

जिल्हा बँकेवर आ. आशुतोष काळे बिनविरोध

Come to District Bank. Ashutosh Kale unopposed

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 11Feb 2021, 17:30

कोपरगाव :   जिल्ह्याची कामधेनु म्हणून ओळख असलेल्या अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शेती पूरक मतदार संघातून कोपरगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे विद्यमान चेअरमन आशुतोष काळे यांची बिनविरोध निवड झाली आहे.

  अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या  निवडणुकीत ८३२ मतदार संख्या असलेल्या शेतीपूरक मतदार संघातून आमदार आशुतोष काळे यांच्यासह ३६ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते, पैकी आज गुरुवारी (११)  रोजी माघारीच्या दिवशी ३५ जणांनी माघार घेतल्याने आशुतोष काळे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची  जिल्हा बँकेच्या संचालक पदी बिनविरोध निवड झाली आहे.

यापूर्वी स्व. सौ. सुशीलामाई काळे, स्व. माजी खासदार कर्मवीर शंकररावजी काळे, माजी आमदार अशोकराव काळे, सौ. पुष्पाताई काळे व सौ.चैताली काळे यांनी देखील जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेच्या संचालक म्हणून आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटविला आहे.                

 आमदार आशुतोष काळे यांची बिनविरोध निवड होताच महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात, आ. डॉ. सुधीर तांबे, आमदार लहू कानडे, मा. चंद्रशेखर घुले, आ. नरेंद्र घुले, पांडुरंग अभंग, राजेद्र नागवडे,राजेंद्र फाळके आदी उपस्थित मान्यवरांनी अभिनंदन केले. तसेच कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक माजी आमदार अशोकराव काळे, प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. पुष्पाताई काळे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम, सर्व संचालक मंडळ, कार्यकारी संचालक गिरीश जगताप, जनरल मॅनेजर सुनील कोल्हे, आसवनीचे जनरल मॅनेजर ज्ञानेश्वर आभाळे, सेक्रेटरी बी.बी. सय्यद, तसेच उद्योग समूहाच्या सलग्न संस्थांचे सर्व चेअरमन, व्हा. चेअरमन, संचालक मंडळ व पदाधिकारी व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहे.           

    चौकट :- दिवसेंदिवस राजकारणाची दिशा बदलत असतांना त्यामुळे कोणतीही निवडणूक सोपी राहिली नाही. अशा परिस्थितीत संपूर्ण जिल्हाभर व्याप्ती असलेल्या आशिया खंडात नावाजलेल्या अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत आमदार आशुतोष काळे यांची संचालकपदी जिल्ह्यात बिनविरोध झालेली निवड सोपी गोष्ट नसून त्यांची बिनविरोध निवड ही त्यांच्या कर्तुत्वाला मिळालेली पोहोचपावती असल्याच्या भावना यावेळी कार्यकर्त्यानी बोलून दाखविल्या.

Leave a Reply

You cannot copy content of this page