शहरातील हद्दवाढ झालेल्या नागरिकांच्या मुलभूत सुविधासाठी विकास निधी द्या,- आ. आशुतोष काळे

शहरातील हद्दवाढ झालेल्या नागरिकांच्या मुलभूत सुविधासाठी विकास निधी द्या,- आ. आशुतोष काळे

Provide development funds for the basic facilities of the citizens who have been demarcated in the city. Ashutosh Kale

 ना. एकनाथ शिंदे यांची सहकार्याची ग्वाही . Testimony of cooperation of Eknath Shinde

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 12Feb 2021, 18:30

कोपरगाव : शहरातील हद्दवाढ झालेल्या नागरिकांना रस्ते,  पाणीपुरवठा, भूमिगत गटारी आदी मुलभूत सुविधा देण्यासाठी विकास निधी द्या, अशी मागणी आमदार आशुतोष काळे यांनी राज्याचे नगरविकास व सार्वजनिक बांधकाममंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्याकडे अहमदनगर येथील महानगरपालिका व नगरपालिका आढावा बैठकीत केली आहे.

यावेळी आ. आशुतोष काळे यांनी कोपरगाव शहराच्या हद्दवाढ झालेल्या भागाच्या विकासाच्या प्रश्नाबरोबरच इतरही विकासाच्या प्रश्नांकडे ना. शिंदे यांचे लक्ष वेधतांना शहराच्या पाणी प्रश्न सोडविण्यासाठी पाच नंबर साठवण तलावाचे महत्व लक्षात आणून दिले. प्रस्तावित असलेल्या पाच नंबर साठवण तलावाची तांत्रिक मंजुरी अंतिम टप्प्यात आहे. त्या प्रस्तावास आपल्या नगरविकास विभागाकडून मंजुरी देवून शहरातील नागरिकांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सहकार्य करावे. कोपरगाव शहरातील शासकीय जागेवर राहत असलेल्या नागरिकांची अतिक्रमणे नियमित होवून सदर जागेचे उतारे त्या रहिवाशांच्या नावावर करून मिळावे, आदी मागण्या केल्या, त्या पूर्ण करण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करणार असल्याची ग्वाही ना. एकनाथ शिंदे यांनी आमदार आशुतोष काळे यांना दिली आहे.                               याप्रसंगी नगरविकास विभागाचे मुख्य सचिव महेश पाठक, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, महापौर बाबासाहेब वाकळे, नगराध्यक्ष विजय वहाडणे,  सुनील गंगूले, नगरसेवक वीरेन बोरावके, मंदार पहाडे, संदीप पगारे, अजीज शेख,  सुनील शिलेदार आदी उपस्थित होते.

Leave a Reply

You cannot copy content of this page