गुरुपौर्णिमा : साई सेवा ट्रस्टच्यावतीने रवंदा येथे रक्तदान कर्तव्य सोहळा
कोपरगाव
गुरुपौर्णिमा उत्सवाचे औचित्य साधून कोपरगाव तालुक्यातील रवंदा येथे रविवारी सकाळी आठ ते दुपारी बारा वाजेपर्यंत रक्तदान कर्तव्य सोहळा रवंदा महादेव मंदिरात पार पडला.
वृक्ष करता है फलदान! अंबर करता है जलदान ! धरती करती है अन्नदान !मानव करेगा रक्तदान !
या रक्तदान कर्तव्य सोहळ्यात रवंदा, सांगवी, मळेगाव या पंचक्रोशीतील ६८ रक्तदात्यांनी रक्तदान केले. साई सेवा ट्रस्ट व डॉक्टर व मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या रक्तदान सोहळ्याचे उद्घाटन डॉक्टर नितीन झवंर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी साईसेवा ट्रस्टचे अध्यक्ष शितल गिरी, राजेंद्र कंक्राळे, अशोक मढवई, सतिष सोनवणे, डॉ. सौ वर्षा झंवर,
डॉ. दिलिप दवंगे डॉ. सतिष जाधव, डॉ. चव्हाण आदीसह साई सेवा ट्रस्टचे पदाधिकारी सदस्य व ग्रामस्थ हजर होते. अध्यक्ष शितल गिरी यांनी सर्वांचे आभार मानले. डॉ. नीता पाटील संजीवनी ब्लड बँक व त्यांच्या सर्व सदस्यांनी व्यवस्था केली होती.