रामदास आठवलेंकडून कोपरे कुटूबांला एक लाखाची मदतीचे,व मुलाला शासकीय सेवेत घेण्याचे आश्वासन
Ramdas Athavale promises Rs 1 lakh to Kopare families, and promises to take child to government service
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 15Feb 2021, 17:00
कोपरगाव : कोपरगावातील रिपाइंचे दिवंगत नेते प्रकाश त्रिंबक कोपरे यांचे निधन झाले. या पार्श्वभूमीवर रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी कोपरगाव येथे त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन कोपरे परिवाराचे सांत्वन केले. दुपारी १२ वाजता आठवले यांचे कोपरगाव येथे आगमन झाले. त्यांनी कोपरे यांच्या निवासस्थानी भेट घेऊन दिवंगत नेते प्रकाश कोपरे यांच्या प्रतिमेला पुप्षहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी रिपाई चे नेते काकासाहेब खंबाळकर, राजाभाऊ कापसे, दिपक गायकवाड , श्रीकांत भालेराव, विजय वाकचौरे, विजय शिंगाडे, नगराध्यक्ष विजय वहाडणे, कोल्हे कारखान्याचे उपाध्यक्ष आप्पासाहेब दवंगे, जितेंद्र रणशूर यांनी दिवंगत नेते प्रकाश कोपरे यांना श्रध्दांजली अर्पण केली. यावेळी तहसीलदार योगेश चंद्रे,प्रकाश कोपरे यांचा मुलगा स्वप्निल कोपरे व कोपरे कुटुंबीय आदी उपस्थित होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर वस्तीगृह येथील शोकसभेत ना. रामदास आठवले यांनी स्वर्गीय प्रकाश कोपरे यांना श्रद्धांजली वाहिली, यावेळी बोलताना आठवले म्हणाले, प्रकाश कोपरे यांनी दलित पँथर या संघटनेत काम केले असून रिपाईत देखील त्यांनी प्रामाणकिपणे काम केले यांच्या जाण्याने रिपाई चे मोठे नुकसान झाले आहे. रिपाइचा एक लढवय्या नेता हरपला. या कुटुंबाला या दुःखातून सावरण्याची शक्ती मिळू दे, तसेच एक दायित्व म्हणून मी एक लाख रुपयांची मदत या कुटुंबाला करीत आहे, या कुटुंबाचा घराचा प्रश्न सोडवून, मुलगा स्वप्निल कोपरे याला शासकीय सेवेमध्ये समाविष्ट करून घेण्याचे आश्वासनही आठवले यांनी दिले आहे.
Post Views:
431